आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीव्ही अपडेट:'इंडियन आयडॉल 12' मध्ये आपल्या लाडक्या त्रिकुटाचे पुनरागमन, पुन्हा एकदा परीक्षकाच्या खुर्चीत हिमेश रेशमिया-नेहा कक्कर आणि विशाल दादलानी

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हे त्रिकुट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाले आहे.

सर्व होतकरू गायकांसाठीचा मंच, इंडियन आयडॉल आपले 12 वे पर्व घेऊन येत आहे. इंडियन आयडॉलचे तिन्ही परीक्षक अर्थातच नेहा कक्कर, विशाल दादलानी आणि हिमेश रेशमिया यांनी 1 ऑक्टोबरपासून शूटिंगला सुरुवात केली आहे. त्यांचा उत्साह आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी परीक्षक नेहा कक्कड आणि विशाल दादलानी यांनी एक स्लो मोशन व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये हे रॉक स्टार इंडियन आयडॉलच्या मंचाची शोभा वाढवताना दिसत आहेत.

नेहा कक्करने विशाल आणि हिमेश यांच्यासोबतचा एक स्लोमोशन व्हिडिओ शेअर करुन आम्ही परतत आहोत!, असे कॅप्शन त्याला दिले होते.

काही दिवसांपूर्वीच विशाल दादलानीने इंडियन आयडॉलच्या सेटवरचा आपला एक फोटो शेअर केला होता.

सर्वांच्या सुरक्षिततेचा विचार करून या पर्वाच्या ऑडिशन्स व्हर्चुअल स्वरुपात घेण्यात आल्या. त्यात सर्व स्पर्धकांना आपापले व्हिडिओ सोनी लिव अॅपवर अपलोड करायचे होते. तेव्हा पुन्हा एकदा इंडियन आयडॉलमध्ये हे त्रिकुट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...