आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछोट्या पडद्यानंतर आता मोठ्या पडद्यावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री हिना खान ही अलीकडेच तिच्या ब्रेकअपच्या वृत्तामुळे चर्चेत आली होती. मात्र नंतर आगामी षडयंत्र या प्रोजेक्टसाठी केलेला हा पब्लिसिटी स्टंट असल्याचे उघड झाले होते. आता पुन्हा एकदा हिना चर्चेत आली आहे. हिनाने अलीकडेच तिची मॅनेजर हिना लाड हिच्या लग्नाला हजेरी लावली होती. हिना लाडने कॉमेडियन भारती सिंगचा मॅनेजर कौशल जोशीसोबत लग्न थाटले. दरम्यान, त्यांच्या लग्नाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावेळी हिना खानने असे काही केले की, नवरदेवाला तब्बल 1 लाख रुपयांचा फटका बसला.
हिना खानच्या मॅनेजरच्या लग्नातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे.
या व्हिडिओत हिना खानने नवरदेवाचे बूट चोरल्यानंतर जी रक्कम मागितली ती ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. यावेळी हिनाने तब्बल 1 लाख 11 हजार रुपयांची मागणी केली आहे. आणि विशेष म्हणजे नवरदेवाने हिनाची ही मागणी पूर्णदेखील केलीय.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओत हिना खानने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. तिने स्लीव्हलेस ब्लाउज परिधान केले आहे. साडीमध्ये तिचा स्टनिंग लूक लक्ष वेधून घेतोय. लग्नात हिनाने डान्सदेखील केला.
वेडिंग रिसेप्शनलाही हिनाने हजेरी लावली होती.
हिना लाड आणि कौशल जोशीच्या लग्नाला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. लग्नाला अभिनेत्री शहनाज गिल हिचीदेखील उपस्थिती होती. यावेळी शहनाज भारती सिंगचा मुलगा लक्ष्यसोबत वेळ घालवताना दिसली. शहनाजने लक्ष्यचे भरपूर लाड केले.
अली गोनीदेखील लग्नाला पोहोचला होता.
हिना खान व्यतिरिक्त भारती सिंग, अली गोनी, जस्मिन भसीन, रुपाली गांगुली, अवनीत कौर आणि अनेरी वजानी यांच्यासह अनेक टीव्ही स्टार्स लग्नात पोहोचले होते. या कलाकारांचे फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.