आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिल्पा शेट्टीचे पुनरागमन:'सुपर डान्सर चॅप्टर 4'च्या शूटिंगवर परतलेल्या शिल्पा शेट्टीचा व्हिडिओ आला समोर, हिना खानने दिला पाठिंबा, म्हणाली...

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 17 ऑगस्टपासून शिल्पाने शूटिंगला सुरुवात केली.

पती राज कुंद्राच्या अटकेनंतर जवळपास महिन्याभरानंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टी पुन्हा कामावर परतली आहे. तिने 17 ऑगस्टपासून डान्स रिअ‍ॅलिटी शो 'सुपर डान्सर चॅप्टर 4' च्या शूटिंगला सुरुवात केली. त्याचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शिल्पा व्हॅनिटीमधून उतरताना दिसते. तिने साडी नेसलेली असून ती चित्रीकरणासाठी जाताना दिसत आहे. याआधी व्हॅनिटीमधून उतरून सेटवर चित्रीकरणासाठी जाताना शिल्पा तिथे असलेल्या फोटोग्राफर्सना पोझ द्यायची, त्यांच्याशी संवाद साधायची. परंतु यावेळी मात्र ती कुणाशीही न बोलता सेटच्या दिशेने गेली.

टीव्ही अभिनेत्री हिना खानने या कठीण काळातदेखील शिल्पा शेट्टीने तिच्या वर्क कमिटमेंटकडे पाठ न फिरवल्याबद्दल तिचे कौतुक केले आहे. हिनाने शिल्पाचा फोटो तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये शेअर करत लिहिले, "यू गो गर्ल, हग्स...'

निर्माते शोमधून शिल्पाला रिप्लेस करणार नव्हते
2016 मध्ये सुरु झालेल्या पहिल्या सीझनपासून शिल्पा शोमध्ये परिक्षक म्हणून आहे. निर्माते तिच्या परत येण्याची वाट पाहत होते आणि तिच्या जागी दुसऱ्या सेलिब्रिटीला घेण्याची त्यांची इच्छा नव्हती.
तिने शूटिंग पुन्हा सुरू केल्याने आम्हाला आनंद आहे. आशा आहे की, ती या सीझनच्या शेवटपर्यंत शोमध्ये राहील. तिचा पती अश्लील अॅप्स प्रकरणात अडकल्यानंतर तिच्यासाठी धैर्याने कामावर परत येणे हा तिच्यासाठी भावनिक निर्णय होता, असे निर्मात्यांनी म्हटले आहे.

शिल्पाच्या अनुपस्थितीत हे सेलेब्स दिसले
शिल्पा गेल्या तीन आठवड्यांपासून शोमध्ये दिसली नाही. तिच्या अनुपस्थितीत काही सेलिब्रिटी गेस्ट शोमध्ये सहभागी झाले होते. ज्यात करिश्मा कपूर, जिनिलिया आणि रितेश देशमुख यांची नावे आहेत.
या शोमध्ये अनुराग बासू आणि गीता कपूरही परीक्षकांच्या भूमिकेत आहेत.

19 जुलै रोजी झाली होती राज कुंद्राला अटक
शिल्पाचा पती राज कुंद्राला पोर्नोग्राफी प्रकरणात 19 जुलै अटक झाली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. आता राज कुंद्राला मुंबई उच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने त्याच्या अटकपूर्व जामीन अर्ज येत्या बुधवारपर्यंत म्हणजे 25 ऑगस्टपर्यंत सुनावणीसाठी राखून ठेवला आहे.

बातम्या आणखी आहेत...