आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निधन:अभिनेत्री हिना खानच्या वडिलांचे कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे निधन, शेवटच्या क्षणी वडिलांसोबत नव्हती हिना

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 20 एप्रिल रोजी मुंबईतील राहत्या घरात हिनाच्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला.

अभिनेत्री हिना खानच्या वडिलांचे मंगळवारी निधन झाले. कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे त्यांची प्राणज्योत मालवली. अखेरच्या वेळी हिना तिच्या वडिलांसोबत नव्हती. कामाच्या निमित्ताने ती सध्या काश्मिरमध्ये असून ती लवकरात लवकर घरी परत येण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले जात आहे.

हिना तिच्या वडिलांच्या अगदी जवळ होती, ती कायम वडिलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच हिना आई-वडिलांसोबत मालदिवला सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली होती. तेथील सुट्टीचा आनंद घेतानाचे फोटोदेखील हिनाने शेअर केले होते.

बातम्या आणखी आहेत...