आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडियन आयडल 12:सवाई भट्ट स्पर्धेबाहेर गेल्याने नाराज झाली अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली, संतप्त सोशल मीडिया यूजर्स म्हणाले - हा शो स्क्रिप्टेड आहे

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या कार्यक्रमातील सवाई हा नव्याचा आवडता स्पर्धक होता.

इंडियन आयडल 12 या कार्यक्रमातून स्पर्धक सवाई भट्ट बाहेर झाला आहे. तो स्पर्धेतून बाहेर पडल्याने चाहत्यांसोबतच अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हीदेखील निराश झाली आहे. या कार्यक्रमातील सवाई हा तिचा आवडता स्पर्धक होता.

सवाई या कार्यक्रमातून एलिमिनेट झाल्याने नव्याला खूपच वाईट वाटले आहे. तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर सवाईचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत दुःखी इमोजी आणि हार्ट ब्रेकचा इमोजी पोस्ट केला आहे. त्यासोबत तिने सवाईला पाठिंबा देत लिहिले की, ' गात रहा आणि चमकत रहा...'

संतप्त सोशल मीडिया यूजर्स म्हणाले - शो स्क्रिप्टेड आहे
सवाई भट्टच्या इविक्शनमुळे नाराज झालेल्या सोशल मीडिया यूजर्सनी हा रिअॅलिटी शो स्क्रिप्टेड असल्याचे म्हटले आहे. एका यूजरने लिहिले, ' इंडियन आयडल बघणे आता बंद करा. सवाई मागील दोन
आठवड्यांपासून टॉप 2 मध्ये होता आणि शंमुखा आणि इतर काही जणांना शोमध्ये टिकवून ठेवण्यासाठी त्याला अचानक बाहेर केले गेले. जनतेकडून मत का मागवता, त्यांच्या मतांना अर्थच कुठे आहे,' अशा संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटू लागल्या आहेत.

सवाईची फॅन आहे नव्या नवेली नंदा
सवाईच्या गाण्याचे नव्याने अनेकवेळा भरभरून कौतुक केले आहे. सवाईने सादर केलेल्या 'उड जा काले कांवा' हे गाणे नव्याला खूपच आवडले होते. त्याचे हे गाणे ऐकून नव्या खूपच भारावून गेली होती. इतकेच
नाही तर फादर्स डे स्पेशल एपिसोडमध्ये सवाईने अमिताभ बच्चन स्टारर 'बागवान' या चित्रपटाचे शीर्षक गीत गायले होते, तेव्हाही नव्याने सवाईचे तोंडभरुन कौतुक केले होते.

बातम्या आणखी आहेत...