आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'इंडियन आयडॉल 12'वर कोरोनाचे सावट:शोचा होस्ट आदित्य नारायणानंतर आता स्पर्धक पवनदीपला कोरोनाची लागण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शोमध्ये वर्च्युअली परफॉर्म करणार पवनदीप

'इंडियन आयडल 12' च्या सेटवर कोरोनाचे सावट बघायला मिळत आहे. या शोचा होस्ट आदित्य नारायणानंतर आता स्पर्धक पवनदीप राजन यालादेखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. वृत्तानुसार उत्तराखंडचा रहिवासी असलेल पवनदीपला मुंबईतील एका हॉटेलमध्ये क्वारंटाइन आहे. या शोच्या गेल्या आठवड्याच्या भागात अभिनेत्री रेखा यांची खास उपस्थिती होती. यावेळी पवनदीपने रेखा यांच्यासोबत एक परफॉर्मन्स दिला होता.

शोमध्ये वर्च्युअली परफॉर्म करणार
वृत्तानुसार, पवनदीप शोच्या आगामी भागात व्हर्च्युअली परफॉर्म करणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, "महाराष्ट्रात वाढत्या कोरोना प्रकरणांमुळे इंडियन आयडॉलचे स्पर्धक एक प्रकारे बायो बबलमध्ये आहेत. रिस्क फॅक्टर वाढला आहे." कोविडची लक्षणे जाणवताच पवनदीपने स्वत:ला आयसोलेट केले आणि स्वतःची चाचणी करुन घेतली होती.

उर्वरित स्पर्धकांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत

पवनदीपचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर शोमधील इतर स्पर्धक आणि परीक्षकांचीही कोरोना चाचणी करण्यात आली. सर्वांचे रिपोर्ट लवकरच येऊ शकतात. पवनदीपला संसर्ग झाल्यापासून इंडियन आयडॉलच्या टीमची चिंता वाढली आहे. परंतु इतर कोणत्याही स्पर्धकाला त्याची लक्षणे दिसली नाहीत. त्यामुळे सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह येतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

आदित्यला गेल्या आठवड्यात झाला होता संसर्ग

इंडियन आयडॉलचा होस्ट आदित्य नारायणने मागील शनिवारी सोशल मीडियावर त्याच्यासह त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. दुसर्‍याच दिवशी आदित्यचे वडील आणि दिग्गज पार्श्वगायक उदित नारायण यांनी दोघेही रुग्णालयात दाखल झाल्याचे सांगितले होते. आता आदित्यला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. आदित्यच्या अनुपस्थितीत ‘इंडियन आयडॉल’ च्या सूत्रसंचालनाची जबाबदारी जय भानुशाली सांभाळत आहे.

बातम्या आणखी आहेत...