आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडॉल’ येत्या 28 नोव्हेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदाच्या सीझनमध्ये नेहा कक्कर, हिमेश रेशमिया आणि विशाल ददलानी हे त्रिकूट परीक्षकांची भूमिका बजावणार आहेत. नववधू नेहा कक्करने हनिमूनहून मुंबईत परल्यानंतर या शोच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. आता या कार्यक्रमाचे नवीन प्रोमो वाहिनीकडून प्रदर्शित केले जात आहेत. या प्रोमोमधून स्पर्धकांची ओळख करुन दिली जात आहे. दरम्यान जयपूरच्या शहजाद अली यांचा व्हिडिओदेखील समोर आला आहे. इंडियन आयडॉलमध्ये ऑडिशन देण्यासाठी आलेल्या या स्पर्धकाला परीक्षकांनी आर्थिक मदत केली आहे.
सोनी टीव्हीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर इंडियन आयडॉलचा प्रोमो शेअर केला आहे. प्रोमो व्हिडिओमध्ये जयपूर येथे राहणारे शहजाद अली इंडियन आयडॉलच्या ऑडिशनसाठी मुंबईमध्ये आले. पण मुंबईला येण्यासाठी त्यांच्या आजी (आईची आई) ने पाच हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. शहजाद हे जयपूरच्या एका कपड्यांच्या दुकानात काम करतात. त्यांच्या बालपणीच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या आजीने त्यांना लहानाचे मोठे केले. आजीने बँकेतून कर्ज घेऊन मुंबईला पाठवले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ते ऐकून नेहा आणि विशाल भावूक झाले.
दरम्यान नेहाने एक लाख रुपये भेट म्हणून शहजाद यांच्या आजीला दिले आहेत. तर विशाल ददलानीने शहजादला तुमच्यासाठी मी एक चांगला गुरु शोधेन जो तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेन असे म्हटले आहे. सध्या इंडियन आयडॉलमधील हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यापूर्वीही शोचे बरेच प्रोमो समोर आले आहेत. यात महाराष्ट्रातून अंजली आणि आशिष, राजस्थानहून सवाई, उत्तराखंडहून शानमुख प्रिया आणि पवनदीप आणि आंध्र प्रदेशातून सिरीशा सहभागी झाले आहेत. 'फिर बदलेगा देश का मौसम' ही यंदाच्या पर्वाची टॅगलाइन आहे.
भावूक झाल्याने अनेकदा ट्रोल झाली नेहा कक्कर
नेहा कक्कर मागील काही वर्षांपासून इंडियन आयडॉलमध्ये परीक्षकाची भूमिका बजावत आहे. या शोमध्ये नेहा अनेकदा स्पर्धकांच्या संघर्षाविषयी ऐकून भावूक झालेली बघायला मिळाली. यामुळे तिला सोशल मीडियावर बरेच ट्रोल करण्यात आले. दरवर्षी नेहाचे मीम्स व्हायरल होत असतात.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.