आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नेहाच्या मनाचा मोठेपणा:'इंडियन आयडॉल 12'च्या सेटवर नेहा कक्कडने गीतकार संतोष आनंद यांना केली 5 लाखांची मदत

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संतोष आनंद यांनी प्यारेलालजींसोबत काम केलेले आहे.

छोट्या पडद्यावरील इंडियन आयडॉल या सांगितिक कार्यक्रमाने अनेक गायकांना या देशातील मोठे गायक बनवले आहे. या नवीन सत्रामध्ये देखील प्रेक्षकांचे संगीताबद्दलचे प्रेम अधिक वाढावे यासाठी इंडियन आयडॉलने पूर्ण तयारी केली आहे. या सत्रातील स्पर्धक तर अत्यंत प्रतिभावान आहेत. या वीकएंडला लक्ष्मीकांत-प्यारेलाल या प्रसिद्ध संगीतकार जोडीतील प्यारेलाल जी मंचावर उपस्थित असणार आहेत.

इंडियन आयडॉल टीमने याच कार्यक्रमात प्रसिद्ध गीतकार संतोष आनंद यांना देखील आमंत्रित केले आहे. संतोष आनंद यांनी प्यारेलालजींसोबत काम केलेले आहे. त्यांनी सध्या त्यांची आर्थिक परिस्थिती बरी नसल्याचे सांगितले. त्यांच्या डोक्यावर असलेल्या कर्जाबद्दल ऐकून नेहाला खूप वाईट वाटले आणि तिने संतोष यांना 5 लाख रुपये देण्याचे ठरवले. तिच्या मते संतोषजी हे संगीत उद्योगातील एक महत्त्वाचे नाव आहे त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारे मदत करण्याची तयारी तिने दर्शवली. त्यांची कहाणी ऐकून ती अतिशय भावूक झाली.

नेहाने भारतीय मनोरंजन उद्योगाला देखील संतोषजींना काम देण्यासाठी आवाहन केले. फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपण त्यांना 5 लाख रुपये देत आहोत असे ती म्हणाली. यावेळी नेहाने “एक प्यार का नग्मा” हे गीत म्हटले आणि संतोषजींनी देखील तिच्या सोबत काही ओळी म्हटल्या.

प्यारेलाल यांची खास उपस्थिती असलेला इंडियन आयडॉलचा हा एपिसोड या वीकएंडला रात्री 8.00 वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर प्रेक्षकांना बघता येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...