आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडियन आयडॉल 12:सायली कांबळेच्या वडिलांसाठी सुपरहीरो मोमेंट, म्हणाली - 'माझे वडील एखाद्या सुपरहीरोपेक्षा जराही कमी नाही'

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘दिलबरो’ हा गाण्यावरील सायली किशोर कांबळेच्या सुंदर परफॉर्मन्सनंतर सेटवर उपस्थित सर्वजण भावुक झाले.

इंडियन आयडॉल 12 च्या या आठवड्यात फादर्स डे विशेष भाग रंगणार आहे. या भागात स्पर्धकांचे कुटुंबीय आपल्या लाडक्या मुला/मुलीचे मनोबल वाढवण्यासाठी आवर्जून उपस्थित असणार आहेत. या भागात भावना आणि मनोरंजन यांचा सुंदर मिलाफ असणार आहे. या शोचा होस्ट आदित्य नारायण सर्व स्पर्धकांच्या आईवडिलांकडून त्यांच्या मुलांविषयीचे गंमतीदार किस्से जाणून घेणार आहे. परीक्षक अन्नू मलिक, नेहा कक्कड, हिमेश रेशमिया आणि शोमध्ये आलेले पाहुणे मनोज मुंतशिर सादर होणार्‍या परफॉर्मन्सेसचा आनंद घेत घेत स्पर्धकांच्या फिरक्याही घेताना दिसतील.

‘दिलबरो’ हा गाण्यावरील सायली किशोर कांबळेच्या सुंदर परफॉर्मन्सनंतर सेटवर उपस्थित सर्वजण भावुक झाले, विशेषतः सायलीचे वडील- किशोर कांबळे. अलीकडच्या संकट काळात कोविडचे फ्रंटलाइन वर्कर म्हणून अव्याहतपणे काम करणार्‍या किशोर कांबळी यांचे परीक्षकांनी खूप कौतुक केले. सायलीने आपल्या लहानपणीची एक आठवण सांगितली. ती म्हणाली की तिचे वडील जे काम करायचे, ते तिला आवडायचे नाही. पण हळूहळू तिने स्वतःला समजावले. तिला ही जाणीव झाली की, तिचे वडील किती परोपकाराचे काम करत आहेत. तिला त्यांच्याबद्दल अपार आदर आणि प्रेम वाटते.

याविषयी बोलताना सायली म्हणाली, “मी माझ्या वडिलांचा व्यवसाय माझ्या मैत्रिणींपासून लपवायचे कारण त्या सगळ्या तशा डॉक्टर किंवा इंजिनियर यांसारख्या उच्चभ्रू कुटुंबातल्या होत्या. पण कोविडचा उपद्रव सुरू झाल्यानंतर मला हे प्रकर्षाने जाणवले की, माझे वडील एखाद्या सुपरहीरोपेक्षा जराही कमी नाहीयेत. त्यांनी अनेक लोकांचे जीव वाचवले आहेत आणि अनेक रुग्णांची सेवा केली आहे. आज फादर्स डे चे औचित्य साधून मी माझ्या वडिलांचे त्यांच्या उदार, निस्पृह आणि धाडसी सेवेबद्दल आभार मानते. त्यांची मुलगी असल्याचा मला अभिमान वाटतो. मला ही जाणीव आहे की, मी फारशी शहाणी मुलगी नव्हते. पण त्यांनी मात्र नेहमी माझ्यावर निरपेक्ष प्रेमाचा वर्षावच केला आणि मला आधार दिला. मी सदैव त्यांची ऋणी राहीन.”

यावर सायलीचे वडील म्हणाले, “सायली म्हणजे आम्हाला मिळालेले वरदान आहे. तिने आमची सगळी स्वप्ने पूर्ण केली आहेत. तिची प्रतिभा म्हणजे आपल्या कारकिर्दीत ती भविष्यात खूप पुढे जाणार आहे याची साक्ष आहे. मला नेहमीच तिचा अभिमान वाटतो आणि भविष्यातही वाटेल.'

बातम्या आणखी आहेत...