आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Indian Idol 12: Vishal Dadlani Forgets Old Slang And Hug Honey Singh, The Dispute Was Happen Between Them 7 Years Ago

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंडियन आयडॉल 12:विशाल ददलानीने जुने रुसवे-फुगवे विसरुन हनी सिंगला मारली मिठी,  7 वर्षे जुना होता वाद

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चेन्नई एक्स्प्रेसमधील गाण्यावरुन झाला होता वाद

रॅपर यो यो हनी सिंग आणि गायक-संगीतकार विशाल ददलानी यांनी सर्व जुने रुसवे फुगवे विसरुन 'इंडियन आयडॉल 12' च्या सेटवर एकमेकांना मिठी मारली. 'इंडियन आयडॉल 12' या शोमध्ये आपल्या आगामी गाण्याच्या प्रमोशनच्या निमित्ताने हनी सिंगने हजेरी लावली होती.

विशालने हनीला मिठी मारली
'इंडियन आयडॉल 12' च्या आगामी एपिसोडमध्ये प्रेक्षकांना हनी-विशाल यांच्यातील पॅच-अप बघायला मिळणार आहे. हनी आणि विशाल या शोमधील स्पर्धक सवाई भट्टच्या 'ठरकी छोकरो' या गाण्याच्या परफॉर्मन्सवेळी स्टेजवर आले होते. यावेळी दोघांनी यावेळी फक्त स्पर्धकांसोबत गाणेच गायले नाही तर बीट बॉक्सिंगचे कौशल्यही दाखवले. स्टेजवर विशाल म्हणाला, "लोक गेल्या काही वर्षांपासून हनीबद्दल बरेच काही बोलत आहेत. हनी इथे आहे आणि तो आमच्याबरोबर आहे. मला वाटते की यावेळी त्याला मिठी मारणे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे."

चेन्नई एक्स्प्रेसमधील गाण्यावरुन झाला होता वाद
2013 मध्ये रिलीज झालेल्या शाहरुख खान स्टारर चेन्नई एक्स्प्रेस या चित्रपटातील लुंगी डान्स या गाण्याच्या रिलीजवेळी विशाल आणि हनी यांच्यात वाद झाला होता. विशाल ददलानी इंडियन आयडॉल 12 मध्ये परीक्षकाची भूमिका बजावत आहे. या शोमध्ये हनी त्याचे नवीन गाणे सइयां जीच्या प्रमोशनसाठी आला होता. या गाण्यात हनीसोबत अभिनेत्री नुसरत भरुचा दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...