आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गायिका भूमी त्रिवेदी सध्या रिअॅलिटी शो 'इंडियन प्रो म्युझिक लीग’ मध्ये कॅप्टनच्या रूपात दिसत आहे. 'गुजरात रॉकर्स’ टीमला लीड करणाऱ्या भूमीने नुकतेच ‘दिव्य मराठी’सोबत चर्चा केली. या वेळी तिने या शोविषयी काही आठवणी सांगितल्या..
'इंडियन प्रो म्युझिक लीग’च्या आधी मी आणखी एक रिअॅलिटी शोमध्ये कॅप्टन राहिले आहे. त्यावेळी मी भारत-कोलकाता आणि वेस्ट बंगाल रिजनची कॅप्टन होते. विशेष म्हणजे गुजराती असूनही मला पूर्वी राज्यांच्या टीमचा भाग बनवण्यात आले होते. यंदा गुजरात राॅकर्समध्ये सहभागी झाले आहे. एक खूप मोठी जबाबदारी मिळाल्याचे वाटत आहे. मी गुजरातचे संगीत, संस्कृती, साहित्य जे आतापर्यंत लोकांनी पाहिली नाही ते त्यांच्यापर्यंत पाेहोचवू इच्छित आहे. आमच्या टीममध्ये जावेद अली, हेमंत बृजवासी आणि अदिती सिंह शर्मा आहेत. मीच फक्त गुजराती आहे, याचा अभिमानही वाटत आहे. मी माझ्या सहकलाकारांना आपल्या शहराविषयी सांगत असते. आपल्या संगीताच्या माध्यमातून मी त्यांना गुजरातचे दर्शन घडवतेे, त्यात खूप मजा येते.
या शोमधून खूप काही शिकायला मिळते
ऑफ-स्क्रीन सेटवर देखील वातावरण खेळीमेळीचे असते. नुकतेच आम्ही पंजाब टीमच्या विरोधात एक गुजराती अॅक्ट तयार केले होते. त्यात आम्ही कच्छला ट्रिब्यूट केले होते. भंकूपमधून ते शहर सावरले आहे ते पूर्ण जगासाठी एक उदाहरण आहे. मोठ्या गायकांनी त्यात अभिनय केला. मेहनत घेतली. आपल्या जीवनात सर्व काही मिळवून देखील ते शिकण्यासाठी नेहमी तयार राहतात. खरं तर, या शोमधून खूप काही शिकायला मिळतेय.
असे वातावरण समारंभांतच पाहायला मिळते
पहिल्यांदाच अशा कार्यक्रमाचा भाग झाले ज्यात एकाच वेळी बरेच गायक एकाच मंचावर दिसत आहेत. असा देखावा बऱ्याचदा फक्त पुरस्कार सोहळ्यामध्ये दिसतो. दिग्गज कलाकारांपासून ते उदयोन्मुख प्रतिभा, सर्वच शोमध्ये सहभागी आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.