आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
तब्बल तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर झी टीव्हीवरील ‘इश्क सुभान अल्लाह’ या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षीपर्यंत झारा सिद्दिकीची भूमिका साकारणारी मूळ अभिनेत्री ईशा सिंगचे कमबॅक आता या मालिकेत होणार आहे. या मालिकेच्या पहिल्या सीझनचा समारोप झाराचा (ईशा सिंग) कड्यावरून गाडी कोसळून मृत्यू झाल्याच्या धक्कादायक वळणासह झाला होता.
प्रेक्षकांना आशा होती की, नाट्यमय पद्धतीने कबीर (अदनान खान) आणि झारा पुन्हा एकदा भेटतील. पण दुसऱ्या सीझनची सुरूवात नव्या नाट्यमय वळणांसह झाली ज्यात दुःखी कबीर आणि नवीन झारा पाहायला मिळाली. मात्र लॉकडाऊननंतरच्या नवीन टि्वस्टमध्ये ईशा सिंग नवीन अवतारात परत येणार आहे.
आत्तापर्यंत ती मरण पावलेली असल्याचा सर्वांचा समज होता, पण आता खरी झारा ऊर्फ ईशा सिंग कबीर आणि त्याच्या परिवाराच्या आयुष्यात रोमांचक प्रवेश करेल. ती म्युझिक हीलर अशा एका नवीन रूपात दिसून येईल. संगीताच्या असाधारण वेदनाशामक शक्तीमध्ये तिचा विश्वास असून त्यामध्ये अगदी सर्वाधिक नैराश्याचा झटका आलेल्या व्यक्तीलाही बरे करण्याची ताकद आहे. धर्माचा त्याने लावलेल्या अर्थानुसार संगीत हे हराम आहे अशी कबीरची मानसिकता असते. ती त्याच्या ह्या जुन्या विचारांना आवाहन देते. आणि हे करताना त्याच्या आयुष्यातील ती झारा असल्यालाही ती नकार देते.
आपल्या व्यक्तिरेखेमध्ये परत येण्याबद्दल ईशा सिंग म्हणाली, “मी माझ्या काही व्यक्तिगत कारणांमुळे यातून बाहेर पडले होते, पण अर्थातच माझ्या हृदयात खोल कुठेतरी हा शो नेहमीच माझे बाळ होते आणि त्यामुळे झाराच्या व्यक्तिरेखेमध्ये परत येताना खूप छान वाटतंय. हे माझ्यासाठी घरीच परत येण्यासारखे आहे. ‘इश्क सुभान अल्लाह’ हा माझा झी टीव्हीवरील दुसरा शो असून सर्वच कलाकार आणि तंत्रज्ञ मला माझ्या घरच्यांसारखे आहेत. त्यांच्यासोबत आणि माझा सहकलाकार अदनान खानच्या मी अगदी निकट आहे. आमचे छान जमते आणि मला खात्री आहे की झारा आणि कबीरसोबत रीकनेक्ट होण्यासाठी उत्सुक असतील. मी अनेक आठवणींसह गेले होते आणि आता पुन्हा नवीन काही आठवणी निर्माण करण्यासाठी परत आले आहे'', असे ईशा म्हणाली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.