आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Ishqbaaz Actress Niti Taylor Did A Secret Wedding To Parikshit Bawa In 13 August, Saying 'We Were About To Get Engaged But Got Married Directly After Seeing The Status Of Covid 19'.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बधाई हो:'इश्कबाज' फेम अभिनेत्री नीती टेलरने परीक्षित बावासोबत ऑगस्टमध्ये केले सिक्रेट वेडिंग, म्हणाली - 'आम्ही साखरपुडा करणार होतो, पण कोविड 19ची स्थिती बघता लग्न थाटले'

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लग्नाच्या दोन महिन्यांनी नीतीने आपल्या लग्नाविषयी खुलासा केला आहे.

'इश्कबाज' फेम अभिनेत्री नीती टेलरने प्रियकर परीक्षित बावासोबत ऑगस्टमध्ये लग्न केले आहे. हे एक सिक्रेट वेडिंग होते. या लग्नाला केवळ दोघांचे कुटुंबीय उपस्थित होते. खरं तर ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात हे दोघे लग्न करणार होते, तर ऑगस्टमध्ये दोघांचा साखरपुडा निश्चित झाला होता. मात्र कोविड 19ची परिस्थिती बघता दोघांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या लग्नाचा निर्णय घेतला. लग्नाच्या दोन महिन्यांनी नीतीने लग्नाविषयी सांगितले आहे.

नीतीने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तिने 13 ऑगस्ट रोजी परीक्षित बावाशी लग्न केले. लग्नासाठी आधी ऑक्टोबर महिन्यातील मुहूर्त काढण्यात आला होता. मात्र कोविड 19 च्या परिस्थितीत बघता त्यांनी लग्न पुढे ढकलले नाही आणि 13 ऑगस्ट रोजी लग्न केले. खरं तर 13 ऑगस्ट रोजी साखरपुडा होणार होता. मात्र त्याच दिवशी लग्न करण्यात आले. नीतीचे पती परीक्षित हे भारतीय लष्कराचे अधिकारी आहेत.

नीतीने सांगितल्यानुसार, त्यांच्या लग्नात काही निकटवर्तीय सहभागी झाले होते. गुरुग्राममधील गुरुद्वारा येथे हा विवाह सोहळा पार पडला. लग्न एवढ्या घाईघाईत झाले की तिच्या दोन बहिणीदेखील लग्नात सहभागी होऊ शकल्या नाहीत. ही महामारी संपल्यावर लग्नाचे ग्रॅण्ड सेलिब्रेशन करणार असल्याचे नीतीने सांगितले.

अवघ्या आठवड्याभरात केली लग्नाची तयारी
नितीने पुढे सांगितले की, 13 ऑगस्टला लग्न करण्याचा निर्णय 6 ऑगस्ट रोजी घेण्यात आला. यामुळे माझ्या आयुष्यातील या खास दिवसाच्या तयारीसाठी मला केवळ एक आठवड्याचा कालावधी मिळाला होता. आमचे इतर कुटुंबीय, मित्र व्हर्च्युअली या लग्नात सहभागी झाले होते.

ग्रॅण्ड सेलिब्रेशननंतर हनीमूनचे करणार प्लानिंग
आपल्या हनीमूनविषयी नीती म्हणाली, सर्व काही सामान्य झाल्यानंतर आणि सर्वांसोबत ग्रॅण्ड सेलिब्रेशन केल्यानंतर आम्ही हनीमूनवर जाऊ. नितीने ऑगस्टमध्ये तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नववधूच्या रूपातील छायाचित्रे शेअर केली होती, पण त्यावेळी तिने लग्नाबाबत खुलासा केला नव्हता. त्यामुळे ही छायाचित्रे एखाद्या फोटोशूटची असावीत, असा अंदाज बांधला गेला होता.

बातम्या आणखी आहेत...