आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बिग बॉस 14 या टेलिव्हिजन रिअॅलिटी शोमध्ये प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा जान सहभागी झाला होता. निक्की तांबोळीसोबतच्या जवळीकपासून ते मराठी भाषेचा अपमान केल्यामुळे तो चर्चेत राहिला. दरम्यान त्याच्या वडिलांनी त्याच्या संगोपनावर प्रश्न उपस्थित केला होता. या आठवड्यात, जान सानू बिग बॉसच्या घरातून बेघर झाला. जानने घराबाहेर आल्यावर वडील कुमार सानू यांच्या वक्तव्यावर भाष्य करत आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यांना आपल्या संस्कारांविषयी बोलण्याचा काहीच अधिकार नसल्याचे जानने म्हटले. त्यानंतर आता कुमार सानू यांनीदेखील जानच्या या वक्तव्यामुळे आपल्याला वाईट वाटल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी जानला स्वतःचे नाव बदलण्याचा सल्ला दिला आहे
कुमार सानूंनी जान सानूला नाव बदलण्याचा सल्ला दिला
टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना कुमार सानू म्हणाले, ‘जानच्या एका मुलाखतीत आणि बिग बॉसमध्ये देखील माझी आईच माझे वडील असल्याचे म्हणताना ऐकले आहे. आईप्रति असणारा आदर कौतुकास्पद आहे. त्याने त्याच्या आईला आणखी सन्मान द्यावा असे वाटते. त्याने आपले नाव जान कुमार सानू बदलून जान रिटा भट्टाचार्य करावे. कारण रिटाने त्याच्यासाठी खूप कष्ट केले आहेत. लोक त्याची तुलना माझ्याशी करतात, ते एखाद्या नव्या कलाकारासाठी चुकीचे आहे.’
जानला काम मिळवून देण्यासाठी मदत केली: कुमार सानू
बिग बॉसच्या घरात नॉमिनेशनवेळी राहुल वैद्यने जान सानूला घराणेशाहीवरुन टोमणा मारला होता. त्यावर मी माझ्या वडिलांपासून लहानपणीच वेगळा झालोय, असे जानने म्हटले होते. वडिलांनी म्युझिक करिअरसाठी कोणतीही मदत केली नसल्याचे त्याने म्हटले होते. मात्र कुमार सानू यांनी त्याचे विधान खोटे ठरवले आहे. जानच्या करिअरमध्ये मदत करण्यासाठी मुकेश भट्ट, रमेश तौरानी आणि इंडस्ट्रीतील इतर काही लोकांसोबत चर्चा केल्याचे कुमार सानू यांनी सांगितले. मात्र त्याला काम द्यावे की नाही हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असेल, असेदेखील ते म्हणाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.