आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Jagannath Nivangune Found Corornavirus Positive On Set Of TV Show Mahanayak Dr. BR Ambedkar Shooting Halted For 3 Days

शूटिंगवर कोरोनाचे सावट:‘एक महानायक बी. आर. आंबेडकर’ मालिकेतील जगन्नाथ निवंगुणेंना कोरोनाची लागण, 'मेरे साईं'च्या सेटवरही क्रू मेंबर पॉझिटिव्ह 

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आतापर्यंत तीन मालिकांच्या सेटवर कोरोना रुग्ण आढळले आहेत.

टीव्ही इंडस्ट्रीत चित्रीकरणाला सुरुवात होऊन अवघे दोन आठवडे झाले आहेत. पण शूटिंग सेटवर कोरोनाचे सावट दिसून आले आहे. ‘एक महानायक बी. आर. आंबेडकर’ या मालिकेतील अभिनेते जगन्नाथ निवंगुणे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सावधगिरी म्हणून मालिकेचे चित्रीकरण तीन दिवसांसाठी थांबवण्यात आले आहे.

या मालिकेत ते बाबासाहेबांच्या वडिलांची भूमिका साकारतात. जगन्नाथ यांच्यावर सध्या वरळी येथील रुग्णालयात उपचार सुरू असून ते सुखरुप आहेत. त्यांना कोणतीच लक्षणे जाणवत नव्हती. त्यामुळे मालिकेच्या सेटवरही तणावाचे वातावरण आहे. निवंगुणे यांच्या संपर्कात आलेल्यांचीही कोरोना चाचणी करण्यात येत असल्याचे समजते. 

अँड टीव्हीवर प्रसारित होणा-या या मालिकेचे चित्रीकरण फिल्मसिटी गोरेगाव येथे सुरु झाले होते. चित्रीकरणाला सुरुवात झाल्यानंतर निवंगुणे सेटवर योग्य ती सावधगिरी बाळगत होते, त्यांनी सेटवरची छायाचित्रेदेखील त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केली होती.  

  • मेरे साईंच्या सेटवरही आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 

सेटेवर कोरोना रुग्ण आढलेली ही तिसरी मालिका आहे. यापूर्वी 'मेरे साईं' या मालिकेच्या सेटवरदेखील एका क्रू मेंबरला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे तीन दिवस या मालिकेचेही चित्रीकरण बंद होते. याशिवाय 'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेच्या सेटवरही एकाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त आहे. 

महत्त्वाचे म्हणजे 19 मार्च ते जून या कालावधीत बंद असलेल्या टीव्ही इंडस्ट्रीने 13 जुलैपासून अनेक शोचे नवीन भाग प्रसारित करण्याची घोषणा केली आहे. पण कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत चालली आहे. कोरोनाचं आव्हान कलाकारांसमोरही उभे झाले आहे.  

0