आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशातील कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीवरही वाईट परिणाम झाला आहे. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली. आता प्रसिद्ध टीव्ही अभिनेता रवी दुबेलादेखील कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. रवीने स्वत: सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर रवीने स्वत:ला घरीच क्वारंटाइन केले आहे. सोबतच मागील काही दिवसांत त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांना त्याने कोविड चाचणी करुन घेण्याची विनंतीही केली आहे.
माझे जवळचे माझी काळजी घेत आहेत
रवी दुबेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आणि लिहिले, ‘माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया काळजी घ्या आणि प्रकृतीकडे लक्ष द्या. कोरोनाची लक्षणे जाणवल्यास तातडीने चाचणी करुन घ्या. मी स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतले आहे. माझ्या जवळचे माझी काळजी घेत आहेत. सुरक्षित राहा,’ असे त्याने म्हटले आहे.
रवीने काही दिवसांपूर्वीच घेतला होता लसीचा पहिला डोस
काही दिवसांपूर्वीच रवीने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. रवीच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे म्हणजे, ती अलीकडेच ओटीटी वेब शो 'जमाई राजा 2.0' मध्ये दिसला होता. त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळाली होती. शोमध्ये अभिनेत्री निया शर्मा त्याच्यासोबत दिसली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.