आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्माष्टमी सेलिब्रेशन:रोहिताश गौरपासून ते ग्रेसी सिंग, स्नेहा वाघपर्यंत, टीव्ही स्टार्स असा साजरा करतात जन्माष्टमीचा सण

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • छोट्या पडद्यावरील कलाकार हा सण मोठ्या उत्साहात साजरा करत असतात.

जन्माष्टमीचा सणाच्या दिवशी छोट्या पडद्यावरील सर्वच कलाकार श्रीकृष्ण देवाचे घरी स्वागत करून आपल्या कुटुंबासोबत उत्साहात सण साजरा करण्यासाठी उत्सुक आहेत. यामध्ये या कलाकारांचा समावेश आहे. - 'हप्पू की उलटन पलटन'मधील हप्पू सिंग (योगेश त्रिपाठी) आणि राजेश (कामना पाठक), 'कहत हनुमान जय श्री राम'मधील अंजनी माता (स्नेहा वाघ), 'भाबीजी घर पर हैं'मधील तिवारीजी (रोहिताश्व गौर), 'संतोषी माँ सुनाए व्रत कथाएँ'मधील संतोषी माँ (ग्रेसी सिंग), 'गुडिया हमारी सभी पे भारी'मधील गुडिया (सारिका बहरोलिया) आणि गुड्डू (करम राजपाल).

  • माझा मुलगा कान्हासारखा तयार होतो - योगेश त्रिपाठी

''दरवर्षी जन्माष्टमीला आम्ही श्रीकृष्ण देवासाठी छोटा पाळणा बनवतो आणि तो फुले तसेच दागिन्यांनी सजवतो. मख्खन मिश्री, खीर, मीठी मठरी आणि गुजिया यांसारखे गोड पदार्थ नन्हे कान्हाला प्रसाद म्हणून देण्यासाठी बनवले जातात. त्यानंतर कुटुंबातील सदस्य या पदार्थांचा एकत्र आस्वाद घेतात. पूर्वी माझा मुलगा दिशू कान्हाची वेशभूषा करत असे आणि घरात बनवलेली मिठाई तसेच सर्वांकडून दिले जाणारे प्रेम यांचा आनंद घेत असे.”

  • बालपणापासूनच कृष्णासोबत खास प्रेम - स्नेहा वाघ

आपली बालपणीची आठवण सांगताना स्नेहा वाघ म्हणाली, “जन्माष्टमीला माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचे स्थान आहे, कारण मला श्रीकृष्ण देवाबाबत कायमच प्रेम वाटत आले आहे. मी साधारण चार-पाच वर्षांची असेन आणि जन्माष्टमीला एका मेळाव्याचे आयोजन केलेले होते. त्यात मला श्रीकृष्णाच्या वेशभूषेतील एक मुलगा दिसला. त्यामुळे मला कृष्णाबद्दल आणखी प्रेम वाटू लागले. मोठी होत असताना मी त्याच्याबद्दल वाचण्यास सुरूवात केली आणि त्यांच्या शिकवणीमुळे मला अडथळ्यांचा सामना करण्याची शक्ती मिळाली आणि माझ्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम झाला. यंदा मी सर्व लहानग्या कृष्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना जन्माष्टमीच्या खूप शुभेच्छा देत आहे!"

  • आईच्या हातची खीर मिस करेल - कामना पाठक

हप्पू की उलटन पलटनमधील राजेश (कामना पाठक) म्हणते की, “व्यक्तीच्या श्रद्धेचा प्रभाव त्याच्या एकूणच व्यक्तिमत्वावर होत असतो. आपल्या रोजच्या आयुष्यात सकारात्मक विचार बिंबवून आपल्याला आशावादी राहण्यास मदत होते. श्रीकृष्ण देवाची शिकवण त्याच्या काळाच्या पुढे होती आणि आजही ती अत्यंत सुसंगत आहे. बुद्धी आणि मन यांचे उत्तम संतुलन त्यांनी साधले होते. मला या सणाच्या दिवशी आईने बनवलेल्या खिरीची आठवण येईल आणि हा माझ्या अत्यंत आवडत्या सणांपैकी एक असून मी प्रत्येकाच्या आयुष्यात गोडवा आणि आनंद आणेल अशी आशा करते.”

  • बालपणी स्वतः कान्हा बनायचे रोहिताश गौर

रोहिताश्व गौर म्हणाले की, “श्रीकृष्ण हा दुष्टांचा संहार करणारा आहे. जन्माष्टमी प्रत्येक दुष्टाचा नाश करून चांगलेपणाचे अस्तित्व स्थापित करणारा सण आहे. लहानपणी मी छोट्या कान्हासारखी वेशभूषा करत असे आणि या सणाची उत्साहाने वाट पाहत असे. या साथीच्या आजारामुळे आम्ही घरीच पूजा आणि खाद्यपदार्थ तयार करणार आहोत. माझी प्रत्येकासाठी हीच प्रार्थना आहे की, या जन्माष्टमीला देव श्रीकृष्ण प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद आणि शांतता आणेल.”

  • घरीच साधी पूजा करु - ग्रेसी सिंग

ग्रेसी सिंग म्हणाली की, “आम्ही घरात साधी पूजा करणार आहोत. मोठा उत्सव नाही. मी श्रीकृष्णा देवाच्या सर्व भाविकांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा देते. हा धमाल व आनंदाचा सण आहे आणि तो आपल्याला चुकीच्या गोष्टींविरोधात लढण्याची शिकवण देतो. मी ईश्वराला प्रार्थना करते की, तुमच्या आयुष्यात आनंद व भरभराट येईल आणि तुम्हा सर्वांना त्याचे आशीर्वाद मिळतील.”

  • आईने बनवलेल्या स्वादिष्ट जेवणाशिवाय हा सण अपूर्ण - सारिका

सारिका बहरोलिया म्हणाली की, “ग्वाल्हेरमध्ये माझ्या घरी आई आम्हाला कृष्णाच्या देवळात पूजा करायला घेऊन जायची. नंतर ती सवयच लागली. मला माझ्या खिडकीतून दही हंडी बघणे आणि स्पीकरवर वाजणारी हिंदी गाणी ऐकणे खूप आवडायचे. आईने बनवलेल्या स्वादिष्ट जेवणाशिवाय दिवस साजरा व्हायचा नाही. या जन्माष्टमीला माझ्या कुटुंबाची आठवण मला नक्की येईल.”

  • साथीच्या रोगामुळे दहीहंडीचा उत्साह जाणवणार नाही - करम राजपाल

करम राजपाल म्हणाला की, “यावेळी कुटुंबासोबत अत्यंत शांतपणे उत्सव साजरा केला जाईल. या साथीच्या रोगामुळे दहीहंडीचा उत्साह जाणवणार नाही. त्यामुळे आम्ही घरीच छोटासा कार्यक्रम करायचे ठरवले आहे. आम्ही मध्यरात्री श्रीकृष्णाचा जन्म साजरा करू. त्यानंतर पूजा आणि पंजिरी, खीर, माखन मिश्री इत्यादी खास पदार्थ नैवैद्यासाठी ठेवू. यावर्षी माझी एकमेव प्रार्थना म्हणजे श्रीकृष्ण देवाने सर्वांना काळजी व चिंतामुक्त करावे आणि सर्वांना प्रेम, शांतता व आनंद द्यावा.”

बातम्या आणखी आहेत...