आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंडियन आयडॉल 12:श्रीदेवी यांच्याशी कधीच एक शब्दही बोलल्या नाहीत जया प्रदा, खंत व्यक्त करताना म्हणाल्या - आम्ही एकमेकींशी बोलू शकलो असतो तर बरे झाले असते

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जया प्रदा इंडियन आयडॉल 12 च्या मंचाची शोभा वाढवणार आहेत.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सांगितिक कार्यक्रम इंडियन आयडॉल 12 च्या या वीकेण्डच्या भागात बॉलिवूड अभिनेत्री जया प्रदा यांची खास उपस्थिती असणार आहे. स्पर्धेतले सगळे होतकरू गायक जयाजींच्या एकापेक्षा एक सुंदर अशा गाण्यांवर परफॉर्म करतील. जया प्रदा सेटवर येणार म्हणून सगळे स्पर्धक खूप आनंदी आहेत. तसेच कार्यक्रमाचा होस्ट जय भानुशाली, परीक्षक विशाल दादलानी, नेहा कक्कड आणि हिमेश रेशमिया या खास पाहुणीचे आपल्या शो मध्ये स्वागत करताना खूप उत्साहात आहेत.

जया प्रदा इंडियन आयडॉल 12 च्या मंचाची शोभा वाढवणार आहे आणि या भागात आपल्या जीवन प्रवासातील काही किस्से प्रेक्षकांना सांगणार आहे. आपल्यात आणि श्रीदेवीमध्ये कधीच भावनिक नाते नव्हते आणि सेटवर आम्ही कधी एकमेकींशी बोललो नाही हे त्यांनी यावेळी सांगितले. त्यांनी सांगितल्यानुसार, श्रीदेवी ही बॉलिवूडमधली त्यांची सर्वात मोठी प्रतिस्पर्धी होती. इंडियन आयडॉलच्या सेटवर सर्व अभिनेत्यांबरोबर आपले नाते कसे होते हे जया प्रदां यांच्याकडून ऐकायला मिळेल.

श्रीदेवीबरोबरचे आपले नाते कसे होते याविषयी बोलताना जया प्रदा म्हणाल्या, 'मी खूप नशीबवान आहे असे मी मानते. आमच्या दोघींमध्ये वैयक्तिक वितुष्ट कधीच नव्हते पण आमच्या तारा कधीच जुळल्या नाहीत. आम्ही कधीही एकमेकींशी नजर मिळवली नाही, कारण आमच्या दोघींमध्ये स्पर्धा होती, मग ती पोशाखाची असो किंवा डान्सची! प्रत्येक वेळी जेव्हा आम्ही भेटायचो, तेव्हा आमचा एकमेकींशी परिचय करून देण्यात यायचा. आम्ही फक्त एकमेकींना ‘नमस्ते’ म्हणून निघून जायचो.'

जया यांनी पुढे सांगितले, 'मला अजून आठवते आहे की, मकसद चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळेस जितूजी आणि राजेश खन्ना जी यांनी आम्हा दोघींना एका मेकअप रूममध्ये एक तास कोंडून ठेवले होते, पण आम्ही दोघी एकमेकींशी एक शब्दही बोललो नाही आणि त्यानंतर सगळ्यांनी आमच्यासमोर हात टेकले. आज ती आपल्यात नाहीये, तर मला तिची खूप आठवण येत आहे. मला एकाकी वाटते आहे, कारण या बॉलिवूड इंडस्ट्रीतील ती माझी मोठी प्रतिस्पर्धी होती. ती जर मला कुठूनही ऐकू शकत असेल, तर या मंचावरून मी हेच म्हणेन की, आम्ही एकमेकींशी बोलू शकलो असतो तर बरे झाले असते.'

बातम्या आणखी आहेत...