आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • JD Majethia Is Maintaining Social Distancing On The Set With The Help Of Umbrella, Appeals To All The Makers To Adopt This New Idea

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवी कल्पना:छत्रीच्या मदतीने सेटवर सोशल डिस्टन्सिंग पाळत आहेत जेडी मजेठिया, ही नवीन कल्पना अवलंबण्याचे सर्व निर्मात्यांना केले आवाहन

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ही अनोखी कल्पना शेअर करत जेडी यांनी अन्य कलाकार आणि निर्मात्यांनाही त्याचा अवलंब करण्याचा सल्ला दिला आहे.

इंडस्ट्रीतील सर्व मोठ्या संघटनांनी शूटिंगच्या नियमांवर सहमती दर्शवल्यानंतर बहुतेक टीव्ही मालिकांचे चित्रीकरण सुरु झाले आहे. महाराष्ट्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व कलाकारांना सामाजिक अंतर पाळणे सक्तीचे केले आहे. यासाठी सब टीव्हीवर प्रसारित होणा-या 'भाकरवडी' या मालिकेच्या टीमने एक नवीन युक्ती शोधून काढली आहे. ज्यात सर्वजण छत्र्यांच्या मदतीने एकमेकांपासून अंतर ठेवताना दिसत आहेत.

'भाकरवडी' या मालिकेचे निर्माते जेडी मजेठिया यांनी अलीकडेच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक सर्जनशील कल्पना शेअर करत व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. यात 'भाकरवडी'च्या सेटवर उपस्थित असलेले सर्व सदस्य छत्री घेऊन दिसत आहेत. ही प्रक्रिया प्रत्येकाला एकमेकांपासून नियमित अंतर ठेवण्यास मदत करत आहे.  

व्हिडिओ शेअर करताना जेडी यांनी लिहिले, प्रेक्षकच नाही तर आम्ही आमच्या कलाकारांसह प्रत्येकाची काळजी घेतोय. सर्वजण योग्य ती सावधगिरी बाळत सेटवर उपस्थित झाले आहेत. ही  अनोखी कल्पना आपल्याला एकमेकांपासून दूर ठेवण्यास मदत करेल.

ही अनोखी कल्पना शेअर करत जेडी यांनी अन्य कलाकार आणि निर्मात्यांनाही त्याचा अवलंब करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच ही पद्धत इतर क्षेत्रांमध्ये काम करणार्‍यांनाही उपयोगी ठरू शकते, असेही ते म्हणाले आहेत. सब टीव्हीवरील 'भाकरवडी'चे शुटिंग शुक्रवारपासून सुरू झाले असून ही एका गुजराती कुटुंबाची कहाणी आहे.

बातम्या आणखी आहेत...