आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हमारीवाली गुड न्यूज:20 वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत हे दोघे, शक्ती आनंद म्हणाले, 'जूही ही एक अप्रतिम अभिनेत्री'

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेली 20 वर्षे टीव्ही उद्योगात असलेले जूही परमार आणि शक्ती आनंद प्रथमच एकत्र भूमिका साकारण्यास खूपच उत्सुक आहेत.
  • शक्ती आनंद म्हणाले, हमारीवाली गुड न्यूजमध्ये जुहीसोबत काम करताना खूप मजा येतेय.

नुकतीच छोट्या पडद्यावर ‘हमारीवाली गुड न्यूज’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली असून मालिकेत सासू-सुना एकमेकींच्या सुखासाठी कोणत्याही टोकाला जाताना दाखविले आहे. किंबहुना या मालिकेत गुड न्यूज देण्यासाठी सासू रेणुका (जूही परमार) आणि सून नाव्या (सृष्टी जैन) यांनी आपापल्या नात्याच्या भूमिकांची चक्क अदलाबदल केल्याचे दाखविले आहे.

या नव्या आणि रंजक मालिकेत नामवंत अभिनेत्री सृष्टी जैन ही सून नाव्याची भूमिका साकारणार आहे. 23 वर्षांची नाव्या ही बालवाडीतील मुलांना शिकवीत असे. टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री जूही परमार ही सासू रेणुकाची भूमिका उभी करणार आहे. ती तिवारी कुटुंबाचा मुख्य आधारस्तंभ असते. ती निश्चयी स्वभावाची आणि देवाला मानणारी असते आणि ती एका कीर्तन मंडळीचीही सदस्य असते. तिचा पती व नाव्याचे सासरे मुकुंद यांची भूमिका शक्ती आनंद साकारत आहेत. मुकुंद यांचे स्वत:चे किराणामालाचे दुकान असते आणि “जैसे चल रहा है, बढिया है. कुछ बदलने की जरूरत क्या है?” ही त्यांची वृत्ती असते.

जूही आणि शक्ती आनंद हे दोघेही अतिशय गुणी कलाकार असून ते टीव्हीवरील लोकप्रिय कलाकार आहेत. पण गेली 20 वर्षे हे दोघेही टीव्ही मालिकांमध्ये भूमिका साकारीत असले, तरी त्यांनी एकाच मालिकेत यापूर्वी एकदाही भूमिका रंगविलेली नाही. आता मात्र ‘हमारीवाली गुड न्यूज’ या मालिकेत ते दोघेही एकत्र भूमिका साकारण्याच्या कल्पनेने उत्सुक बनले आहेत. सेटवर त्यांच्यात मैत्रीचे नाते निर्माण झाले आहे.

या मालिकेबद्दल शक्ती आनंद म्हणाले, “जूहीबरोबर एकत्र भूमिका साकारणारी हमारीवाली गुड न्यूज ही आमची पहिलीच एकत्र मालिका आहे. तिच्याबरोबर आतापर्यंत काम करण्याचा माझा अनुभव फारच छान राहिला आहे. जूही ही एक उच्च दर्जाची, सराईत आणि अप्रतिम अभिनेत्री आहे. मी तिच्याबद्दल काय बोलू! तिला तिचे संवाद पाठ असतात, कुठे उभं राहायचं, ते तिला ठाऊक असतं, आपलं वाक्य कधी बोलायचं ते तिला चांगलंच ठाऊक असतं आणि एखादा प्रसंग कसा खुलवायचा, तेही तिला चांगलं ठाऊक असतं. त्यामुळे ती खरोखरच छान अभिनेत्री आहे. गेली 20 वर्षं ती टीव्ही मालिकांच्या क्षेत्रात भूमिका साकारीत असल्याने कधी काय करायचं आणि एखादा प्रसंग कसा उठावदार करायचा, ते तिला चांगलंच ठाऊक आहे. त्यामुळेच तिच्याबरोबर काम करताना खूप मजा येते आणि आमच्यात छान सामंजस्य निर्माण झालं आहे.”

जूही परमारने यास दुजोरा देताना म्हटले, “शक्ती हा एक उत्कृष्ट अभिनेता असून या मालिकेत त्याच्याबरोबर भूमिका साकारताना फार छान अनुभव येत आहे.”

‘हमारीवाली गुड न्यूज’च्या सेटवर शक्ती आनंद आणि जूही परमार यांच्यात निकोप मैत्रीचे संबंध निर्माण झाले असले, तरी या मालिकेत मुकुंद आणि रेणुका यांच्यात वादावादी सुरूच आहे. मुकुंद आणि रेणुका यांच्या जीवनात काय घडत आहे, ते या मालिकेत बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.