आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुःखद:'कहानी घर घर की' फेम अभिनेता सचिन कुमारचे निधन, झोपतेच मालवली प्राणज्योत; अक्षय कुमारसोबत होते जवळचे नाते

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सचिन अभिनेता अक्षयचा कुमारचा आतेभाऊ होता.

‘कहानी घर घर की’ या मालिकेतील अभिनेता सचिन कुमार याचे शुक्रवारी (15 मे) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 42 वर्षीय सचिनची झोपेतच प्राणज्योत मालवली. मुंबईतील अंधेरीस्थित राहत्या घरी हार्ट अटॅकने त्याचे निधन झाले. सचिन बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या आत्याचा मुलगा होता.  सचिनने सुरुवातीला अभिनेता म्हणून इंडस्ट्रीत काम केलं. त्यानंतर तो फोटोग्राफीकडे वळला होता.  

राकेश पॉल, चेतन हंसराज, विनीत रैना, सुरभी तिवारी यांसारख्या टीव्ही कलाकारांनी सचिनच्या निधनावर शोक व्यक्त केला.  सचिनचा जवळचा मित्र  राकेश पॉलने टाइम्स ऑफ इंडियाला सांगितल्यानुसार, “सचिनचा झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी त्याच्या आईवडिलांनी त्याच्या बेडरुमचे दार ठोठावलं. मात्र काहीच उत्तर न आल्याने त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या किल्लीने दार उघडलं. तोपर्यंत सचिनने जगाचा निरोप घेतला होता.”

अभिनेता चेतन हंसराज म्हणाला, “ही अत्यंत धक्कादायक बातमी आहे. मलासुद्धा सोशल मीडियावरून सचिनच्या निधनाची बातमी समजली. कहानी घर घर की या मालिकेत आम्ही एकत्र काम केले होते. मात्र सचिनने नंतर अभिनयात काम करणे सोडून दिले होते.”

‘कहानी घर घर की’ या मालिकेशिवाय सचिनने ‘लज्जा’ या मालिकेतही काम केल् होतं. यामध्ये त्याने नकारात्मक भूमिका साकारली होती. या दोन्ही गाजलेल्या मालिका होत्या.

बातम्या आणखी आहेत...