आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलाविश्वात आणखी एक आत्महत्या:'कहानी घर घर की' फेम अभिनेता समीर शर्माची आत्महत्या, दोन दिवसांपूर्वीच गळफास घेतल्याचा संशय

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 44 वर्षीय समीर गेल्या काही दिवसांपासून कुणाला भेटला नव्हता.
  • घटनास्थळावरुन सुसाइड नोट सापडली नसल्याने समीरच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे.

कलाविश्वातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता समीर शर्माने मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. 44 वर्षीय समीर मुंबईतील मालाड पश्चिमस्थित अंहिसा मार्गावरील नेहा सीएचएस या बिल्डिंगमध्ये वास्तव्याला होता. घरातील किचनच्या छताला त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.

मालाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीरने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात या इमारतीत फ्लॅट भाड्याने घेतला होता. रात्र ड्यटुीला असलेल्या सोसायटीच्या चौकीदाराने समीरला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिले आणि बिल्डिंगमधील लोकांना कल्पना दिली. मृतदेहाची अवस्था पाहता समीरने दोन दिवसांपूर्वीच आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. घटनास्थळावरून पोलिसांना सुसाइड नोट सापडलेली नाही. पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

  • समीर आजारातून बरा झाला होता

यापूर्वी समीर मोठ्या आजारातून बाहेर पडला होता. बराच काळ त्याच्यावर उपचार सुरु होते. प्रकृती ठिक झाल्यानंतर तो अभिनयाकडे पुन्हा वळला होता. त्याने स्टार प्लसवरील 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत कुहूच्या वडिलांच्या भूमिका साकारली होती. सध्या तो ‘ये रिश्ते है प्यार के’ या मालिकेत शौर्य माहेश्वरीची भूमिका साकारत होता.

सहकलाकारासोबत समीर शर्मा
सहकलाकारासोबत समीर शर्मा
  • समीर मुळचा दिल्लीचा होता

समीर शर्मा मूळचा दिल्लीचा होता. शिक्षण संपल्यानंतर तो बंगळुरुला गेला आणि तेथील एका अॅड एजन्सीमध्ये काम केले. यानंतर, तो अभिनय क्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी मुंबईला आला. समीरचे लग्न अचला शर्माशी झाले होते आणि काही काळापासून दोघे वेगळे राहात असल्याचे सांगितले जाते.

सहकलाकारांसोबत समीर शर्मा
सहकलाकारांसोबत समीर शर्मा
  • या शोजमध्ये झळकला होता समीर

समीरने छोट्या पडद्यावरील कहानी घर घर की, क्योंकी की सास भी कभी बहू थी, ज्योती, ये रिश्ते हैं प्यार के, लेफ्ट राइट लेफ्ट, गीत हुई सबसे पराई, 26/12, दिल क्या चाहता है, वो रहने वाली महलों की, आयुष्मान भवः, इस प्यार को क्या नाम दूं?, एक बार फिर, भूतू या गाजलेल्या मालिकांमध्ये अभिनय केला होता. याशिवाय हंसी तो फंसी या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. इत्तेफाक या चित्रपटातही तो झळकला होता.

बातम्या आणखी आहेत...