आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Kapil Sharma May Be A Guest In Sunil Grover's 'Gangs Of Filmistan', The Audience Is Also Curious About ItKapil Sharma May Come As A Guest On Sunil Grover's Show 'Gangs Of Filmistan'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपकमिंग:सुनील ग्रोव्हरच्या 'गँग्स ऑफ फिल्मिस्तान'मध्ये पाहुणा म्हणून सहभागी होऊ शकतो कपिल शर्मा, प्रेक्षकांमध्येही याबद्दल आहे उत्सुकता

किरण जैन, मुंबई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा शो 31 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

'गँग्स ऑफ फिल्मिस्तान' या आगामी शोबद्दल प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विनोदवीर सुनील ग्रोव्हर छोट्या पडद्यावर कमबॅक करतोय. सूत्रांच्या माहितीनुसार, कपिल शर्मा लवकरच या शोमध्ये पाहुणा म्हणून दिसू शकतो. कपिल आणि सुनील यांच्यातील वाद चांगलाच गाजला होता. त्यामुळे या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि ते दोघे चर्चेत राहिले होते.

पण आता मात्र या दोघांमधील वाद निवळला आहे. सर्व गोष्टी सुरळीत होताना दिसत आहेत. दोघेही आपापल्या क्षेत्रात चांगली कामगिरी करत आहे. पण आतापर्यंत ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येईल अशी बातमी आली नव्हती. मात्र आता 'गँग्स ऑफ फिल्मिस्तान' या शोचे निर्माते या शोसाठी सर्वोत्तम गोष्टी करण्यात कसलीही कसर सोडत नाहीत. या शोच्या निर्मात्यांनी या जोडीला एकत्र आणण्याची योजना आखली आहे.

या शोमध्ये शिल्पा शिंदे, उपासना सिंह, डॉ संकेत भोसले झळकणार आहेत. या सर्वांसोबत सुनील ग्रोव्हरचे शोमध्ये असणे सर्व प्रेक्षकांसाठी नक्कीच एखाद्या ट्रीटपेक्षा कमी नाही. हा शो 31 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser