आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
प्रसिद्ध विनोदवीर कपिल शर्माने चाहत्यांना पुन्हा एकदा गुड न्यूज दिली आहे. लवकरच कपिलच्या घरी दुस-यांदा पाळणा हलणार आहे. अर्थातच तो दुसऱ्यांदा ‘बाबा’ होणार आहे.कपिल शर्माची पत्नी गिन्नी गर्भवती असून, जानेवारी 2021 मध्ये ती आपल्या दुस-या बाळाला जन्म देणार आहे. अलीकडेच भारती सिगने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये गिन्नी तिचा बेबी बंप फ्लाँट करताना दिसली.
गिन्नीची काळजी घेण्यासाठी कपिल शर्माचे कुटुंब आणि गिन्नीची आईदेखील मुंबईला आले आहे. कपिल शर्माला या आधी एक मुलगी असून, अनायरा हे तिचे नाव आहे. यावर्षी 10 डिसेंबर रोजी ती एक वर्षाची होणार आहे. कपिल नेहमीच तिचे क्युट फोटो शेअर करत असतो.
कपिलची मैत्रीण आणि कॉमेडियन भारती सिंगने करवा चौथच्या निमित्ताने इन्स्टा लाइव्ह केले होते. या व्हिडिओत गिन्नीची छोटीशी झलक दिसली होती. यात तिचा बेबी बम्प स्पष्ट दिसला होता.
कपिल आणि गिन्नी यांचे 12 डिसेंबर 2018 रोजी लग्न झाले होते. येत्या 12 डिसेंबरला हे दोघे त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करणार आहेत.
11 किलो वजन कमी करुन चर्चेत आला कपिल
अलीकडेच द कपिल शर्मा शोमध्ये कपिलने लॉकडाऊनच्या काळात आपले 11 किलो वजन कमी केल्याचे सांगितले होते. तो लवकरच वेब सीरिजच्या माध्यमातून आपला डिजिटल डेब्यू करण्यास सज्ज झाला आहे. या वेब शोसाठी वजन कमी केल्याचा खुलासा स्वतः कपिलने केला. या वेब शोसाठी त्याने तब्बल 20 कोटी रुपये मानधन घेतल्याचीही चर्चा आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.