आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडिया ट्रॉलिंग:कपिल शर्माने शोमध्ये 'द काश्मीर फाइल्स'चे प्रमोशन करण्यास दिला नकार, नेटकरी संतापले

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली

कपिल शर्माचा वादांशी जवळचे नाते आहे. पुन्हा एकदा तो सोशल साईटवर ट्रेंड होत आहे. यावेळी 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटामुळे तो ट्रोल होत आहे. झाले असे की, एका चाहत्याने चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना त्यांच्या आगामी 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाचे प्रमोशन कपिल शर्मा शोमध्ये करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. यावर प्रतिक्रिया देताना विवेक म्हणाले की, ते राजा आणि आम्ही रंक आहोत. विवेकच्या या पोस्टनंतर आता सलमान खानचेही नाव जोडले जाऊ लागले आहे.

सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली
सोशल मीडियावर एका नेटक-याने लिहिले की, 'विवेक सर तुम्ही तुमच्या चित्रपटाचे प्रमोशन कपिल शर्मा शोमध्ये करायला हवे. कपिल भाई तुम्ही सर्वाना सहकार्य केले आहे. कृपया या चित्रपटाला प्रमोट करा. आम्ही मिथुन दा आणि अनुपम खेर यांना एकत्र बघू इच्छितो.'

याच्या उत्तरात विवेक यांनी लिहिले की, 'द कपिल शर्मा शोमध्ये कोणाला आमंत्रित करावे हे मी ठरवू शकत नाही. हे पूर्णपणे कपिल शर्मा आणि त्याच्या निर्मात्यांवर अवलंबून आहे. जोपर्यंत बॉलfवूडचा संबंध आहे, एकदा मिस्टर बच्चन गांधी कुटुंबासाठी म्हणाले होते – 'वो राजा हैं हम रंक'. यानंतर आता या वादात सलमान खानचेही नाव पुढे आले आहे. कारण कपिल शर्मा शोचा निर्माता सलमान खान आहे.

आणखी एका नेटक-याने लिहिले, 'कपिल शर्माला तुमच्या शोमध्ये या चित्रपटाचा प्रोमो पाहायला आवडेल.' यावर उत्तर देताना विवेक म्हणाले की, 'त्यांनी आम्हाला शोमध्ये आमंत्रित करण्यास नकार दिला आहे. कारण आमच्या चित्रपटात बॉलिवूडमधील एकही मोठा कमर्शिअल स्टार नाही.'

द काश्मीर फाइल्स
'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटात 90 च्या दशकात काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या याबद्दल सांगण्यात आले आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव, पृथ्वीराज सरनाईक दिसणार आहेत. हा चित्रपट 11 मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...