आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
प्रसिद्ध विनोदवीर कपिल शर्मा सोमवारी मुंबई विमानतळावर दिसला. मात्र, यावेळी तो व्हीलचेअरमध्ये होता आणि त्याला घेऊन जाणा-या व्यक्तीने पीपीई किट घातली होती. कपिलला नेमके काय झाले होते, तो व्हीलचेयरवर का होता, यामागचे नेमके कारण समोर आलेले नाही. पण फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याचे चाहते त्याच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त करत आहेत. कपिल लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी ते प्रार्थना करत आहेत.
अलीकडेच दुस-यांदा बाबा झाला कपिल
1 फेब्रुवारी रोजी कपिल शर्मा दुसर्यांदा बाबा झाला आहे. त्याची पत्नी गिन्नी चतरथ हिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. सोशल मीडियावर ही गोड बातमी शेअर करताना कपिलने लिहिले होते, "नमस्कार, आज सकाळी आमच्या घरी मुलाने जन्म घेतला. देवाच्या कृपेने बाळ आणि आई दोघेही बरे आहेत. आपल्या सर्वांच्या प्रेम, आशीर्वाद आणि प्रार्थनांसाठी धन्यवाद."
तीन आठवड्यांपासून प्रसारित झाला नाही कपिलचा शो
कपिल शर्माचा 'द कपिल शर्मा शो' मागील तीन आठवड्यांपासून छोट्या पडद्यावर प्रसारित झाला नाही. 30 जानेवारी रोजी 'द कपिल शर्मा शो'चा शेवटचा एपिसोड प्रसारित झाला होता. यात 'वागले की दुनिया' च्या स्टारकास्ट व्यतिरिक्त म्युझिक व्हिडिओ 'मेहंदी वाले हाथ' फेम गुरु रंधावा आणि संजना सांघी सहभागी झाले होते.
लवकरच परतणार शो
काही दिवसांपूर्वी, 'द कपिल शर्मा शो'ची सदस्य आणि कॉमेडियन भारती सिंग हिने सांगितले होते की, हा ब्रेक शोमध्ये काही तरी नवीन करण्याचा प्रयत्न करण्यासाठी घेण्यात आला आहे. हा शो पुन्हा एकदा नवीन पात्र आणि उत्साहासह परतेल. इतकेच नाही तर नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या एका प्रोजेक्टसाठी कपिलने हा ब्रेक घेतल्याचेही वृत्त आहे. मात्र कपिलचा हा प्रोजेक्ट वेब सीरिज आहे की चित्रपट, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.