आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कपिल शर्मा बिझी:वेब सीरिजसाठी पुढील महिन्यात 'द कपिल शर्मा शो' मधून ब्रेक घेणार कपिल, मुलीचा पहिला वाढदिवस आणि लग्नाच्या दुस-या वाढदिवसाचे सेलिब्रेशन टाकले लांबणीवर

किरण जैन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'दादी की शादी' ही एक कॉमेडी वेब सीरिज असेल.

विनोदवीर कपिल शर्मा लवकरच डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या डेब्यू प्रोजेक्टसाठी कपिल एक महिन्यासाठी 'द कपिल शर्मा शो' मधून ब्रेक घेणार आहे. हा ब्रेक तो पुढील वर्षाच्या सुरुवातीला घेणार आहे.

  • या महिन्याभरात प्रोफेशनलसह पर्सनल कमिटमेंट करणार पूर्ण

शोच्या प्रॉडक्शन हाऊसशी संबंधित सूत्रांनी सांगितले, "लॉकडाउन दरम्यान सोनी लिव्हच्या टीमने कपिलकसोबत एका वेब सीरिजची आयडिया शेअर केली होती. कपिलला ही कल्पना आवडली आणि त्याने त्याच्या K9 प्रॉडक्शन बॅनरमध्ये याची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. ऑक्टोबर महिन्यात या वेब सीरिजचे चित्रीकरण होणार होते. मात्र कोरोनामुळेयाचे वेळापत्रक पुढे ढकलले गेले. आता जानेवारी महिन्यात याच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे, त्यासाठी कपिल त्याच्या शोमधून ब्रेक घेणार आहे. महिन्याभराच्या या ब्रेकमध्ये कपिल त्याच्या प्रोफेशनल कमिटमेंटसह पर्सनल कमिटमेंटही पूर्ण करणार आहे.

  • या महिन्यात शोचे बँक एपिसोड केले जाणार

सूत्रांनी पुढे सांगितले, "या महिन्यात कपिलच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस (12 डिसेंबर) आणि त्याची मुलगी अनयाराचा पहिला वाढदिवस (10 डिसेंबर) आहे. मात्र जानेवारी महिन्यात तो द कपिल शर्मा शोचे चित्रीकरण करणार नाहीये. त्यामुळे डिसेंबर महिन्यातच जानेवारीसाठी बँक एपिसोड्स तयार करावे लागतील. कपिल सतत शूटिंग करणार असल्याने तो मुलीचा वाढदिवस आणि लग्नाचा वाढदिवस साजरा करु शकणार नाहीये. मात्र जानेवारी महिन्यात तो हे दोन्ही खास पद्धतीने सेलिब्रेट करणार असून सोबत वेब सीरिजचे शूटिंगही पूर्ण करेल

  • वेब पदार्पणासाठी कमी केले 11 किलो वजन

सध्या कपिल आपल्या वेब डेब्यूसाठी फिटनेसकडे बरेच लक्ष देत आहे. अलीकडेच कपिलने आपल्या वर्कआउट सेशनचे काही व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. कपिलने आपल्या या वेब सीरिजसाठी 11 किलो वजन कमी केले आहे.

  • 'दादी की शादी' असू शकेल वेब सीरिजचे शीर्षक

दैनिक भास्करशी झालेल्या चर्चेदरम्यान कपिलने पहिल्यांदा आपल्या वेब डेब्यूबद्दल खुलासा केला होता. मुलाखती दरम्यान कपिलने सांगितले होते की, "आम्ही लवकरच K9 प्रॉडक्शन्स निर्मित 'दादी की शादी' या वेब सीरिजवर काम सुरु करणार आहोत. याशिवाय पुढील वर्षीसाठी एका चित्रपटावरही बोलणी सुरु आहेत. सध्या माझा संपूर्ण वेळ शोच्या शूटिंगमध्ये जातो. त्यामुळए दुस-या प्रोजेक्टवर काम करणे थोडे अवघड होते. जेव्हा पहिला चित्रपट केला होता तेव्हा शो आठवड्यातून एकच दिवस असायचा आणि शूटिंग लोकेशन मुंबईतच असल्याने काम सोपे व्हायचे. मात्र दुस-या चित्रपटाच्यावेळी खूप धावपळ झाली होती. याचा शोवरही परिणाम झाला होता. त्यामुळे सध्या मोठ्या प्रोजेक्टचा विचार करत नाही."

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser