आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
विनोदवीर कपिल शर्मा दुस-यांदा बाबा होणार आहे. स्वतः कपिलने सोशल मीडियावर ही गोड बातमी दिली आहे. त्याची पत्नी गिन्नी चतरथ लवकरच दुस-या बाळाला जन्म देणार आहे. कपिलचा द कपिल शर्मा शो हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. कपिलचा हा लोकप्रिय कार्यक्रम बंद का होणार हा प्रश्न चाहत्यांना पडला होता. या सगळ्या प्रश्नांवर कपिलने मौन सोडले आहे.
कपिलचा शो का ऑफएअर होतोय?
‘कपिल शर्मा शो’ बंद होणार असल्याचे समजताच चाहत्यांनी सोशल मीडियावर कपिलला टॅग करत विविध प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे. यामध्येच एका चाहत्याने “कपिल सर, हा शो ऑफएअर का जातोय?” असा प्रश्न विचारला. चाहत्याच्या प्रश्नावर कपिलने उत्तर दिले असून त्याचे उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.
Bcoz I need be there at home with my wife to welcome our second baby 😍🧿 https://t.co/wdy8Drv355
— Kapil Sharma (@KapilSharmaK9) January 28, 2021
“मला माझ्या दुसऱ्या बाळाच्या स्वागतासाठी पत्नीसोबत घरी काही वेळ घालवायचा आहे”, असे उत्तर कपिलने दिले. विशेष म्हणजे या उत्तरातून तो दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याचे त्याने जाहीर केले आहे. त्यामुळे सध्या त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
आता थोड्या कालावधीसाठी कपिल शर्मा 'द कपिल शर्मा शो' प्रेक्षकांचा निरोप घेत असला तरी चांगल्या कन्टेटसह तीन महिन्यांनंतर परत येणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.