आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Kapil Started Shooting For The Show With Bharti Singh, Kiku Sharda, Krushna Abhishek, Said 'A New Beginning With Old Faces'

'द कपिल शर्मा शो'चे पुनरागमन:भारती सिंग, किकू शारदा, कृष्णा अभिषेक यांच्यासह कपिलने सुरु केली शोचे चित्रीकरण, म्हणाला - 'जुन्या चेह-यांयांसह नवी सुरुवात'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या शोचे टीव्हीवर लवकरच कमबॅक होणार आहे.

सोनी टीव्हीवरील लोकप्रिय कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो' ब-याच काळानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. या शोचे टीव्हीवर लवकरच कमबॅक होणार आहे. विशेष म्हणजे कपिल शर्माने त्याच्या जुन्या टीमसह म्हणजे भारती सिंग, कृष्णा अभिषेक, किकू शारदा, चंदन प्रभाकर आणि सुदेश लाहिरी यांच्यासोबत चित्रीकरणालाही सुरुवात केली आहे.

कपिल शर्माने अलीकडेच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून आपल्या टीमबरोबरची काही सुंदर छायाचित्रे शेअर केली आणि लिहिले, 'जुन्या चेह-यांसह नवीन सुरुवात. लवकरच येत आहोत.' छायाचित्रांमध्ये कपिलची संपूर्ण टीम हसताना दिसत आहे. ही छायाचित्रे समोर आल्यानंतर कपिलचे चाहतेदेखील या शोची आतुरतेने वाट बघत आहेत.

कपिल दुस-यांदा बाबा झाला आहे. मुलाच्या जन्माच्या वेळी कपिलने शोपासून काही काळासाठी ब्रेक घेतला होता. पण लॉकडाऊनमुळे त्याने हा शोच ऑफएअर करण्याचा निर्णय घेतला होता. आता काही महिन्यांच्या विश्रांतीनंतर कपिल पुन्हा छोट्या पडद्यावर येण्यास सज्ज झाला आहे. सध्या मात्र शो कधीपासून ऑन एअर होणार याची अधिकृत घोषणा झालेली नाही.

बातम्या आणखी आहेत...