आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉस OTT:करण जोहर होस्ट करणार शो, म्हणाला - 'मी बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून कधीही सहभागी होऊ शकत नाही'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'बिग बॉस ओटीटी के मजे लूट' 8 ऑगस्‍टपासून वूटवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो बिग बॉसचे पुढचे सीझन होस्ट करताना दिसणार आहे. बिग बॉसचे निर्माते एका छोट्या ट्विस्टमधून हा शो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहेत. करण सलमान खानच्या जागी दिसणार आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन निर्मात्यांनी टीव्हीऐवजी बिग बॉस या शोचा पुढील सीझन ओटीटी प्लॅटफॉर्मवर लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे.

'बिग बॉस ओटीटी' चे पहिले सहा एपिसोड ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवले जातील. हे सर्व एपिसोड विना एडिटिंगचे असतील. बिग बॉस हाऊसमधील 24x7 घडणा-या घडामोडी प्रेक्षकांना यात पाहता येईल. दरम्यान, या 6 भागांचे होस्ट करण्यासाठी निर्मात्यांनी करण जोहरला साइन केले आहे. ज्याप्रमाणे सलमान खान दर विकेण्डला स्पर्धकांशी बोलतो, एलिमिनेशन घोषित करतो,स्पर्धकांची कानउघडणी करतो, अगदी त्याप्रमाणे करणसुद्धा असेच काहीतरी करताना दिसणार आहे.

करण जोहर म्हणतो – ''सहा आठवडे घरामध्‍ये? मी एक तासही माझ्या फोनशिवाय राहू शकत नाही''

करण जोहर हा स्‍वत: 'बिग बॉस' या शोचा चाहता आहे. म्‍हणून 'बिग बॉस ओटीटी'चा होस्‍ट बनणे हे या करणसाठी स्‍वप्‍न पूर्ण झाल्‍यासारखे आहे. या रिअॅलिटी शोबद्दल करण उत्सुक असला तरी त्याची स्‍वत: या घरामध्ये स्पर्धक म्हणून जाण्याची इच्छा नाही. बिग बॉस ओटीटी हाऊसमध्‍ये स्‍पर्धक म्‍हणून सहा आठवडे घालवणार का? असा प्रश्न करणला विचारला असता तो म्‍हणतो, ''सहा आठवडे घरामध्‍ये? मी एक तासही माझ्या फोनशिवाय राहू शकत नाही. विचार करा, मी एका तासामध्‍ये किती गोष्‍टी चुकवेन. अरे बापरे, माझी असे होण्‍याची जरादेखील इच्‍छा नाही.''

नियमांनुसार कोणताही स्‍पर्धक घरामध्‍ये त्‍याच्‍यासोबत/तिच्‍यासोबत कोणतेही संप्रेषण डिवाईस घेऊन जाऊ शकत नाही. असे असेल तर, निश्चितच करण या रिअॅलिटी शोमध्‍ये कधीच स्‍पर्धक म्‍हणून दिसणार नाही.

मला माझ्या मुलांपासून दूर राहण्‍याची सर्वाधिक भिती वाटते
करण जोहर हा दोन मुलांचा बाबा आहे. तो आपल्या सोशल मीडिया हँडलवर यश व रूहीचे फोटोज व व्हिडिओज कायम शेअर करत असतो. म्‍हणून त्‍यांच्‍यापासून दीर्घकाळ दूर राहण्‍याचा विचारही आपल्यासाठी भितीदायक आहे असे तो सांगतो. त्याला सर्वाधिक कशाची भिती वाटते याबाबत विचारले असता तो म्‍हणाला, ''माझ्या मुलांपासून दूर राहणे हा माझा सर्वात मोठा फोमो आहे, ते माझ्या आनंदाचे कारण आहेत. त्‍यांच्‍यापासून दीर्घकाळापर्यंत दूर राहणे म्‍हणजे माझ्यात जीव नसल्‍यासारखेच आहे.'

टीव्हीची कमान सलमानच सांभाळणार

करणच्या एंट्रीनंतर सलमानने या शोला अलविदा म्हटले का? हा प्रश्न नक्कीच तुमच्या मनात डोकावला असेल. तर तसे नाहीये. सहा भागानंतर जेव्हा शो टीव्हीवर प्रसारित होईल, तेव्हा सलमान खानचया शोचे सूत्रसंचालन करणार आहे. खरं तर सलमानलाच बिग बॉस ओटीटी होस्ट करण्याची ऑफर दिली होती. मात्र तो आपल्या इतर प्रोजेक्ट्समध्ये बिझी असल्याने इकडे वेळ देऊ शकला नाही. 'बिग बॉस OTT'चा पहिला एपिसोड 8 ऑगस्टला प्रसारित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...