आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडियन आयडॉल 12:करण जोहरने सांगितला  लता मंगेशकरांशी संबंधित रंजक किस्सा, म्हणाला - मी त्यांच्या समोर येण्यापूर्वी खूप घाबरलो होतो

किरण जैन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका दिवसातच रेकॉर्ड झाले होते K3G चे सर्व व्हर्जन

इंडियन आयडॉल सीझन 12 या म्युझिक रिअॅलिटी शोचा आगामी भाग हा सेमी फायनल एपिसोड असणार आहे. अलीकडेच चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने या विशेष भागाचे चित्रीकरण केले. शूटिंग दरम्यान स्पर्धक अरुणिता कांजीलाल हिने 'कभी खुशी कभी गम', 'कुछ कुछ होता है' आणि 'कलंक' चित्रपटातील गाजलेली गाणी सादर केली. त्यानंतर करण जोहरने लता मंगेशकर यांच्याशी संबंधित काही रंजक गोष्टी यावेळी शेअर केल्या.

एका दिवसातच रेकॉर्ड झाले होते K3G चे सर्व व्हर्जन

लता मंगेशकर यांच्या सोबतच टायटल ट्रॅकच्या रेकॉर्डिंगच्या आठवणींना उजाळा देताना करण म्हणाला, "लताजी कधी खुशी कभी गम या चित्रपटाचे शीर्षकगीत गाण्यासाठी आल्या होत्या, तो दिवस मला अजूनही आठवतो. या गाण्याचे एकुण चार व्हर्जन होते. एक मुख्य आणि उर्वरित तीन सॅड व्हर्जन होते, जे संपूर्ण चित्रपटात ऐकायला मिळतात. आमच्या प्लाननुसार, लताजी पहिल्या दिवशी गाण्याचे मुख्य व्हर्जन गातील आणि उर्वरित दुस-या दिवशी गातील, असे ठरले होते. पण लता दीदींनी एकाच दिवशी सर्व गाणी गायली होती. आजही जेव्हा मला त्या दिवसाची आठवण येते, तेव्हा माझ्या अंगावर काटा येतो. मी लता मंगेशकर यांच्यासमोर बसलो होतो आणि त्या जतिन-ललित यांच्यासोबत रिहर्सल करत होत्या. त्यांनी दीदींना म्हटले की, 'दीदी आपण इतर व्हर्जन उद्या रेकॉर्ड करुयात.' त्यावर त्यांनी का? असा प्रश्न विचारला आणि म्हणाल्या की, आपण आजच ही गाणी पूर्ण करुयात.'

12 तास चालणार इंडियन आयडॉल 12 चा फिनाले
करण जोहरने पुढे सांगितले, "मी यश चोप्रा यांना 5 मिनिटांसाठी येण्याची विनंती केली होती, कारण लता दीदींसमोर येण्याची मला खूप भीती वाटत होती आणि मी खूप घाबरलो होतो. यशजी दिवसभर माझ्यासोबत बसून होते आणि ते देखील दीदींना एकाच दिवशी गाण्याचे सर्व व्हर्जन गाताना बघून अवाक् झाले होते."

इंडियन आयडॉल 12 चा फिनाले 15 ऑगस्ट रोजी प्रसारित होणार असून तो आतापर्यंतच्या सर्वात दीर्घ काळ चाललेल्या फिनालेंपैकी एक असेल. हा फिनाले 12 तास चालेल.

बातम्या आणखी आहेत...