आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करण मेहराचा दावा:आता 'ये रिश्ता क्या कहलाता'च्या नैतिकने पत्नीवर केला मारहाण केल्याचा आरोप, म्हणाला - माझ्या मनात आत्महत्येसारखे विचार आले होते

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • करणने त्याची बाजू मांडताना निशा बायपोलर आणि आक्रमक आहे तसेच ती शिवीगाळ करते असा दावा केला होता.

'ये रिश्ता क्या कहलाता है' या गाजलेल्या मालिकेत नैतिकची भूमिका वठवून लोकप्रिय झालेला अभिनेता करण मेहरा आणि त्याची पत्नी निशा रावल यांच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आले आहे. निशाने करणवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आहे. निशाच्या या आरोपानंतर आता करणनेही धक्कादायक खुलासे केले आहेत. त्याने दावा केला की, निशाने त्याला मारहाण केली आणि तो या नात्यात अशा टप्प्यावर पोहोचला की, त्याच्या मनातही आत्महत्येचे विचार येऊ लागले होते.

'चार-पाच वर्षांपासून गोष्टी व्यवस्थित नाहीत'
करणच्या म्हणण्यानुसार, "ती (निशा रावल) कायम रागात असायची. सुरुवातीला ती माझ्यावर शारीरिक अत्याचार करत असे. जेव्हा तिचा अनावर व्हायचा तेव्हा ती मला मारहाण करायची. तिला काहीच कळायचे नाही. ती वस्तू फेकायची आणि तोडायची." करण पुढे म्हणाला, "मला वाटलं की ती बरी होईल आणि काही प्रमाणात ती बरी झाली देखील. गेल्या चार-पाच वर्षांपासून गोष्टी ठीक नाहीत. आणि अशी परिस्थिती निर्माण झाली की माझ्या मनात आत्महत्येचा विचार येऊ लागला होता."

31 मे रोजी हे प्रकरण पोलिसांसमोर आले
31 मे रोजी गोरेगाव पोलिस ठाण्यात निशाच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी करणला अटक केली. मात्र काही तासांनंतरच त्याला जामिनावर सोडण्यात आले. 1 जून रोजी निशाने पत्रकार परिषद घेऊन आपली आपबीती कथन केली. तिने करणवर मारहाण आणि डोके फोडल्याचा आरोप केला होता. यासह करणचे विवाहबाह्य संबंध असल्याचा खुलासा तिने यावेळी केला होता. निशाच्या म्हणण्यानुसार ती वारंवार करणला माफ करत राहिली. पण जेव्हा तिला मारहाण झाली तेव्हा मुलगा काविशसाठी तिला मीडियासमोर यावे लागले

करणचा दावा - निशाने स्वतः भींतीवर डोके आपटले
दुसरीकडे करणने त्याचा 4 वर्षांचा मुलगा कविशबद्दल चिंता व्यक्त केली आहे. करण म्हणाला, 'मला सुरुवातीला कविश निशा सोबत राहावा असे वाटले होते. परंतु आता या सर्व गोष्टींचा माझ्या मुलावर परिणाम होतोय. पण त्याच्यावर याचा परिणाम व्हावा, अशी माझी इच्छा नाही. मला त्याची चिंता लागली आहे.'

दरम्यान यापूर्वीही करणने त्याची बाजू मांडताना निशा बायपोलर आणि आक्रमक आहे तसेच ती शिवीगाळ करते असा दावा केला होता. तो म्हणाला होता, 'निशाच्या म्हणण्याप्रमाणे मी कायदेशीर मार्गाचा वापर करण्यासाठी तयार होतो. मी माझ्या आई-बाबांशी फोनवर बोलण्यासाठी माझ्या खोलीत गेलो. तेव्हा निशा देखील तिथे आली आणि तिने माझ्यासह माझे आई-वडील आणि भाऊ यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ती जोरजोरात ओरडत होती. ती माझ्यावर थुंकली. मी जेव्हा तिला बाहेर जाण्यास सांगितले तेव्हा ती मला धमकी देऊ लागली. मी इथून निघून गेले तर काय करते ते पाहाच अशी धमकी तिने मला दिली होती. त्यानंतर तिने स्वतःचे डोकं भिंतीवर आपटायला सुरुवात केली आणि नंतर हे सर्व मी केल्याचे सर्वांना सांगितले.'

बातम्या आणखी आहेत...