आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Karan Mehra And Her Co Star Himanshi Parashar Locked The Comment Section, The Chat Of Both Went Viral Recently

अ‍ॅक्शनवर रिअ‍ॅक्शन:करण मेहरा आणि त्याची को-स्टार हिमांशी पाराशरने लॉक केले कमेंट सेक्शन, अलीकडेच व्हायरल झाले होते दोघांचे चॅट

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • करण मेहरा आणि हिमांशी पाराशर यांचे अफेअर असल्याची चर्चा आहे.

पंजाबी अभिनेत्री हिमांशी पाराशरने एप्रिलमध्ये एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्याची सध्या खूप चर्चा रंगली आहे. पण आता या पोस्टवरील कमेंट्स व्हायरल झाल्यानंतर अभिनेता करण मेहरा आणि हिमांशी या दोघांनीही त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरील कमेंट सेक्शन लॉक केले आहे. हिमांशीने तिचा पंजाबी शो 'मावां ठंडियां छावां'च्या सेटवरील एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी शेअर केला होता. व्हिडिओमध्ये करण जमीनीवर पडलेल्या हिमांशीच्या मदतीला पुढे येताना दिसतोय.

हिमांशीच्या पोस्टवर करणने दिले होते उत्तर
हिमांशीने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, "करणच्या मते मी डाउन टू अर्थ व्यक्ती आहे." यावर करणने रोमँटिक प्रतिक्रिया दिली होती. यावरुन करण आणि त्याची पत्नी निशा
यांच्यात हिमांशी आल्याचे म्हटले जात आहे.

निशा म्हणाली की, करणने स्वतः विवाहबाह्य संबंधाची कबुली दिली
करणची पत्नी निशा रावल हिने करणविरोधात घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. तिने पोलिसांत त्याविषयीची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सोमवारी पोलिसांनी करणला अटक केली होती. काही तासांनी करणला जामीन मंजुर झाला होता. करणवरील आरोप सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे पुरावे असल्याचा दावा नीशा रावलने केला आहे. पती करण मेहराच्या फोनवर काही मसेज सापडल्यानंतर त्याच्या अफेअर बद्दल लक्षात आल्याचे ती म्हणाली आहे. निशाने सांगितले की, 'करणचे दुसर्‍या मुलीशी प्रेमसंबंध आहेत, याबद्दल मला काहीच माहित नव्हते. मात्र नंतर जेव्हा मला याबद्दल समजले, तेव्हा मी करणला याबद्दल विचारणा केली आणि त्यानेही त्याच्या आयुष्यात एक मुलगी असल्याचे स्वीकारले.' इतकेच नाही तर त्या मुलीशी शारीरिक संबंध असल्याची कबुली करणने दिल्याचे निशाने यावेळी सांगितले.

करणचा दावा - निशाने स्वत:च भींतीवर डोके आपटले होते
दरम्यान त्याआधी करणने त्याची बाजू मांडताना निशा बायपोलर आणि आक्रमक आहे तसेच ती शिवीगाळ करते असा दावा केला होता. तो म्हणाला होता, 'निशाच्या म्हणण्याप्रमाणे मी कायदेशीर मार्गाचा वापर करण्यासाठी तयार होतो. मी माझ्या आई-बाबांशी फोनवर बोलण्यासाठी खोलीत गेलो. तेव्हा निशा देखील तिथे आली आणि तिने माझ्यासह माझे आई-वडील आणि भाऊ यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ती जोरजोरात ओरडत होती. ती माझ्यावर थुंकली. मी जेव्हा तिला बाहेर जाण्यास सांगितले तेव्हा ती मला धमकी देऊ लागली. मी इथून निघून गेले तर काय करते ते पाहाच अशी धमकी तिने मला दिली होती. त्यानंतर तिने स्वतःचे डोकं भिंतीवर आपटायला सुरुवात केली आणि नंतर हे सर्व मी केल्याचे सर्वांना सांगितले.'

बातम्या आणखी आहेत...