आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

जबरदस्त फायदा:लॉकडाऊनच्या काळात 'कसौटी जिंदगी के'साठी करण पटेलने दुप्पट केली फी, आता प्रत्येक एपिसोडसाठी घेणार 3 लाख रुपये 

किरण जैन, मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'कसौटी जिंदगी के' या मालिकेत करण ग्रोव्हरऐवजी आता करण पटेल मिस्टर बजाज ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.

अभिनेता करण पटेल आता लोकप्रिय टीव्ही शो 'कसौटी जिंदगी के'मध्ये मिस्टर बजाजची भूमिका साकारताना दिसणार आहे. यापूर्वी करण सिंह ग्रोव्हर हे लोकप्रिय पात्र साकारत होता. आता बातमी आहे की, मिस्टर बजाज ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी करण पटेलने आपले मानधन दुप्पट केले आहे.

यापूर्वी शोची निर्माती एकता कपूरने लॉकडाऊनमुळे करण ग्रोव्हरला फी कमी करण्यास सांगितले होते, परंतु त्यासाठी तो तयार नव्हता. या कारणास्तव, त्याने शोमध्ये परत येण्यास नकार दिला. असेही म्हटले जाते की, करण आता चित्रपट आणि वेब सीरिजवर आपले लक्ष केंद्रित करतोय. त्यामुळे सध्या त्याचा छोट्या पडद्यावर परतण्याचा विचार नाही.

  • 'ये है मोहब्बतें'साठी करण पटेल प्रत्येक एपिसोडचे घ्यायचा दीड लाख रुपये

रिपोर्ट्सनुसार करण पटेलने 'कसौटी जिंदगी के' साठी आपली फी दुप्पट केली आहे. यापूर्वी, त्याने एकता कपूरच्या 'ये है मोहब्बतें' या मालिकेत रमण भाल्लाची भूमिका साकारली होती, ज्यासाठी तो प्रत्येक एपिसोडसाठी 1.50 लाख रुपये मानधन घेत होता. मात्र, आता त्याला 'कसौटी जिंदगी के'च्या प्रत्येक भागासाठी अंदाजे 3 लाख रुपये दिले जाणार असल्याची माहिती आहे.

  • 30% ने फी वाढवली आणि उर्वरित पैसे आपल्या टीम आणि व्हॅनिटी व्हॅनसाठी घेतोय

असे म्हटले जाते की, करण पटेल या शोची निर्माती एकता कपूर आणि स्टार प्लसच्या अधिका-यांच्या जवळचा आहे आणि तो कधीही त्यांचे म्हणणे टाळत नाही. अशातच जेव्हा करणने आपल्या मानधनात वाढ करण्याची अट त्यांच्यासमोर ठेवली तेव्हा हो-नाही करत एकता त्यासाठी तयार झाली. करण पटेल त्यांना स्पष्ट केले की, त्याने स्वतःची फी फक्त 30% वाढविली आहे आणि बाकीचे पैसे त्याच्या टीम आणि व्हॅनिटी व्हॅनसाठी आहेत.

करणच्या टीममध्ये स्पॉट बॉय, हेअर स्टाइलिस्ट, मेकअप आर्टिस्ट, डिझायनर यांचा समावेश आहे. सेटवर तो स्वतःची व्हॅनिटी व्हॅन घेऊन येईल. लॉकडाऊन लक्षात घेता एकता आणि तिच्या टीमला करणचा हा प्रस्ताव योग्य वाटला आणि त्यांनी करणच्या या पॅकेजला त्वरित मंजुरी दिली.

  • करण पटेलने एकताला सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले

खास बाब म्हणजे, करण सिंग ग्रोव्हरलाही मिस्टर बजाजच्या व्यक्तिरेखेसाठी 3 लाख रुपये मिळायचे. सोबतच त्याच्या टीमला वेगळी फी दिली जायची. इतकेच नाही तर करण सिंह ग्रोव्हरच्या अनेक अटीदेखील होत्या. त्यानुसार, तो 25 दिवसांपेक्षा जास्त काळ शूट करणार नाही आणि सेटवर 12 तासांपेक्षा जास्त वेळ घालवणार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार करण पटेलने एकताला सर्व प्रकारे सहकार्य करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

  • पार्थ समथान आणि एरिका फर्नांडिस यांचीही फी लाखांत आहे 

'कसौटी जिंदगी के' या मालिकेतील पार्थ समथान आणि एरिका फर्नांडिस या मुख्य कलाकारांची एका दिवसाची फी देखील लाखांमध्ये आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अनुराग बासू आणि प्रेरणा या व्यक्तिरेखा साकारण्यासाठी पार्थला सुमारे 1 लाख रुपये आणि एरिकाला सुमारे 1.25 लाख रुपये मिळतात.