आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Entertainment
 • Tv
 • Karan Patel's Mr. Bajaj Look Of Kasautii Is Finalized After 12 Rejected Look, First Picture Came Out From Set

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कसौटी जिंदगी के अपडेट:12 लूक रिजेक्ट झाल्यानंतर फायनल झाला करण पटेलचा मिस्टर बजाज लूक, पहिली झलक आली समोर

किरण जैन. मुंबई6 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • अभिनेता करण पटेल आता मिस्टर बजाजच्या भूमिकेत दिसणार आहे.

'कसौटी जिंदगी के' या मालिकेच्या चाहत्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. शोची निर्माता एकता कपूरने अखेर मिस्टर बजाजचा लूक फायनल केला आहे. अभिनेता करणसिंग ग्रोव्हरने या मालिकेला रामराम ठोकल्यानंतर करण पटेलची वर्णी या मालिकेत लागली. टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती, पण एकताचा जवळचा मित्र असलेल्या करण पटेलने बाजी मारली. सूत्रांच्या माहितीनुसार, स्वतः एकताने करण पटेल साकारणार असलेल्या मिस्टर बजाजचा लूक फायनल केला आहे. 

 • क्रिएटिव्ह टीम प्रत्येक गोष्टीवर एकता बरोबर चर्चा करत आहे

प्रॉडक्शन हाऊसशी संबंधित सूत्राने सांगितल्यानुसार, "शोचे निर्माता करण पटेलची एन्ट्री खूपच भव्य दाखवण्याच्या विचारात आहेत. लॉकडाउननंतर शोची टीआरपी कायम ठेवणे हे एक मोठे आव्हान आहे. त्यामुळे साहजिकच निर्माती एकता कपूरला एकही संधी हातून वाया जाऊ द्यायची नाहीये. तिला आशा आहे की, करणच्या एन्ट्रीमुळे प्रेक्षकांमध्ये नक्कीच कुतूहल निर्माण होईल. त्यामुळे स्वतः ती प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देत आहे. करणच्या एंट्रीपासून ते स्क्रिप्ट, त्याच्या लूकसह प्रत्येक गोष्टीबाबत क्रिएटिव्ह टीम एकता कपूसोबत चर्चा करत आहे. "

 • एकता कपूरने फायनल केला मिस्टर बजाजचा लूक 

सूत्रांनी पुढे सांगितल्यानुसार, "जवळजवळ 12 लूक रिजेक्ट केल्यानंतर एकता कपूरने मिस्टर बजाजचा लूक फायनल केला. दुसरीकडे, करणनेदेखील लूक पूर्ण करण्यासाठी कसलीही कसर सोडली नाही. क्लीन शेव्ह करुन त्याने  खतरों के खिलाडीच्या लूकला गुडबाय केले. सोबतच आपली हेअरस्टाइलदेखील बदलली."

 • मी आशा करतो की मी लोकांच्या अपेक्षा पूर्ण करु शकेल : करण पटेल

दैनिक भास्करशी झालेल्या चर्चेदरम्यान करणने म्हटले, "मिस्टर बजाजचे पात्र माझ्यासाठी खूप आव्हानात्मक आहे. हे पात्र साकारण्यात मला खूप आनंद झाला आहे. ऋषभ बजाजचा लूक निश्चित करण्यास थोडा वेळ लागला कारणजेव्हा तो प्रेक्षकांसमोर येईल तेव्हा या पात्राने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करावी, अशी क्रिएटिव्ह टीम आणि माझी इच्छा आहे. लोकांच्या अपेक्षांवर मी खरा उतरेल, अशी मला आशा आहे. व्यक्तिशः मी माझ्या लूकवर समाधानी आहे, प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे."

 • 'खतरों के खिलाडी 10' मध्येही करण पटेलचा सहभाग

यापूर्वी करण पटेल टीव्ही शो 'ये है मोहब्बतें' मध्ये रमण भल्लाची भूमिका साकारताना दिसला होता. रिअॅलिटी शोबद्दल बोलतांना, करण सध्या 'खतरों के खिलाडी 10' मध्ये एक स्पर्धक म्हणून दिसतोय. 

Open Divya Marathi in...
 • Divya Marathi App
 • BrowserBrowser