आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Karishma Kapoor Counted The Names Of All The Actors In Her House In Super Dancer 4, Anurag Basu Said– Now You Can Add Alia To That List

सुपर डान्सर चॅप्टर 4:करिश्मा कूपरने शोमध्ये सांगितले तिच्या घरात किती अ‍ॅक्टर्स आहेत, अनुराग बासू म्हणाले - 'आता या यादीत तुम्ही आलियाचे नाव जोडू शकता'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • करिश्माने सांगितली कुटुंबातील कलाकारांची नावे

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर अलीकडेच सुपर डान्सर चॅप्टर 4 च्या सेटवर पाहुणी परीक्षक म्हणून सहभागी झाली होती. दरम्यान, शोच्या एका स्पर्धकाने तिला तुमच्या घरात किती अॅक्टर्स आहेत? असा प्रश्न विचारला. त्यावर करिश्मा घरातील सर्व कलाकारांची नावे घेत असताना अनुराग बासू गंमतीने म्हणाले की, "आता तुम्ही आलियाला या यादीत जोडू शकता."

करिश्माने सांगितली कुटुंबातील कलाकारांची नावे
सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओत एक स्पर्धक करिश्माला विचारतोय की, "तुमच्या कुटुंबात किती कलाकार आहेत?" त्यावर करिश्माने उत्तर दिले, "बरेच! माझे पणजोबा पृथ्वीराज कपूर, नंतर माझे आजोबा राज कपूर, शम्मी कपूर, शशी कपूर, नंतर त्यांच्या पत्नी, गीता बाली, जेनिफर आंटी, प्रेम नाथजी, राजेंद्र नाथजी, मग माझे वडील, चिंटू काका, चिंपू काका, माझी आई, मग मी, नंतर करीना आणि रणबीर, अरमान, आधार आणि आता जहांन."

करिश्माने अनुराग यांच्या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले
दरम्यान शोचे परीक्षक आणि रणबीर कपूरसोबत बर्फी आणि जग्गा जासूस या चित्रपटांसाठी काम केलेले अनुराग बासू यांनी आलिया भट्टचे नाव देखील घेतले. ते ऐकून करिश्माने तोंडावर हात ठेवला आणि यावर बोलणे टाळले.

रणबीर लग्नाविषयी म्हणाला होता...

रणबीरने गेल्या वर्षी लग्नाबद्दल एका मुलाखतीत सांगितले होते की, जर महामारी आली नसती तर त्याचे लग्न झाले असते. तो म्हणतात होता, "जर महामारी आली नसती तर आतापर्यंत माझे लग्न झाले असते. मी लवकरच माझे माझ्या जीवनाचे हे ध्येय साध्य करेन." आलिया भट्ट आणि रणबीर कपूर गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. लवकरच ते लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...