आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोलोचा खुलासा:'या' कारणाने करिश्मा कपूरने दिला होता 'दिल तो पागल है' चित्रपटाला नकार,  ‘इंडियन आयडल’च्या मंचावर करिश्माने दिला जुन्या आठवणींना उजाळा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आईच्या समजावण्यानंतर करिश्माने चित्रपटाची ऑफर स्विकारली.

सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडल सीझन 12 च्या आगामी भागात अभिनेत्री करिश्मा कपूर सहभागी होणार आहे. शोचे आगामी भाग करिश्मा कपूर स्पेशल एपिसोड असतील. यावेळी करिश्माने 'दिल तो पागल है' या गाजलेल्या चित्रपटामागील एक रंजक किस्सा सांगितला. विशेष म्हणजे सुरुवातीला करिश्माने हा चित्रपट नाकारला होता. मात्र नंतर तिला तिचा निर्णय बदलावा लागला.

या शोमध्ये करिश्मा म्हणाली, 'मला दिल तो पागल है चित्रपटाची ऑफर आली तेव्हा मला वाटलं हा एक डान्स सिनेमा आहे आणि त्यात माधुरीसोबत काम करायचं? मीच नाही तर अनेक इतर कलाकारांनीदेखील माधुरीसोबत कसं डान्स करणार हे कारण देत चित्रपटाची ऑफर नाकारली होती. त्यामुळे मी देखील नकार दिला.'

पुढे करिश्माने सांगितले, 'त्यानंतर यश चोप्रा आणि आदित्य चोप्रा यांनी शेवटपर्यंत मला चित्रपटाची कथा ऐकवली. तेव्हा माझ्या आईने मला हे आव्हान स्विकारायला हवे असे सुचवले. आई म्हणाली जर तू माधुरीचे नेहमी कौतुक करते तर तुला हा चित्रपट करायला हवा. तू खूप मेहनत घे नक्कीच यश मिळेल.'

‘दिल तो पागल है’ चित्रपट आपल्यासाठी खास असून या चित्रपटावेळी शाहरुख खान आणि माधुरी दीक्षितने पुढे जाण्यासाठी पाठिंबा दिल्याचे करिश्माने सांगितले. या खास भागात टॉप 6 स्पर्धकांनी करिश्मा कपूरची प्रसिद्ध गाणी सादर केली.