आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Kasautii Zingadii Kay Shooting Resumed Three Days After Parth Tested Corona Positive, The Storyline Of Show Will Be Change

कसोटी जिंदगी के:पार्थ समथान कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याच्या तीन दिवसांनंतर पुन्हा सुरू झाली 'कसौटी'ची शूटिंग, स्टोरीलाइनमध्ये होणार बदल 

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवारी पार्थ समाथानचा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर इंडस्ट्रीमध्ये एकच हालचाल सुरू झाली. कारण जेव्हा पार्थचा अहवाल आला तेव्हा तो सेटवर होता. जेथे त्याच्यासोबत इतर 30 सदस्य होते. सर्व टीम आणि कास्टची चाचणी घेण्यात आली असून त्यापैकी एरिका फर्नांडिस, आमना शरीफ यांच्यासह संपूर्ण कास्टचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तीन दिवस शूटिंग थांबवल्यानंतर आता निर्मात्यांनी पुन्हा शूटिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. असे सांगितले जात आहे की पार्थच्या अनुपस्थितीत स्टोरी लाइनमध्ये बदल केला जाईल.

कोण करणार शूटिंग 
शोची मुख्य अभिनेत्री एरिका फर्नांडिस आणि कोमोलिकाच्या भूमिकेतील आमना शरीफ सध्या सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत. मेकर्सने पूजा बॅनर्जी आणि शुभवी चोकसे यांचा भाग शूट करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून शूटिंग पुन्हा सुरू करण्यात आले आहे.

कथा पुढे कशी जाईल

महाराष्ट्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना व परवानगी मिळाल्यानंतर पार्थ समथान 24 जूनपासून शूटिंग करत आहे. ज्यामुळे त्याच्या बहुतेक भागांवर शूट आधीच झाले आहेत. एरिका आणि आमना काही दिवस सेटवर येऊ शकणार नाहीत, आता निर्माते मिस्टर बजाज म्हणजेच करण पटेल यांच्यावर लक्ष केंद्रित करतील. शोच्या नवीन मिस्टर बजाजची एन्ट्री खूपच ग्रँड ठेवण्यात आली होती. त्यामुळे आता ही कथा त्याच्या अवतीभोवतीच फिरेल. 

पार्थ समथान या शोमधून ब्रेक घेणार होता

सूत्रांनुसार पार्थ समथानला त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही अडचणींमुळे त्याच्या करिअरमधून ब्रेक घ्यायचा होता. अंतिम निर्णय एकता कपूरला घ्यायचा असला तरी त्यांनी निर्मात्यांसमोर आपला मुद्दा मांडला होता. या बातमीदरम्यान, पार्थ कोरोना पॉझिटिव्ह निघाला झाली. शोचे नवीन भाग 13 जुलै रोजी प्रसारित करण्यास सुरूवात झाली आहे. जर आता शुटिंग सुरू झाले नाही तर या शोमध्ये अडचणी येऊ शकतात.