आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमिताभ बच्चन यांच्यासाठी का खास आहे केबीसी:20 वर्षांपूर्वी जेव्हा 90 कोटींच्या कर्जात बुडाले होते बिग बी, तेव्हा याच शोने त्यांना सावरण्यात केली होती मोठी मदत

मुंबई7 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • अनेक मुलाखतींमध्ये अमिताभ बच्चन यांनी म्हटले आहे की, आपल्या आयुष्यातील केबीसीचे योगदान कधीही विसरू शकत नाही.
 • कर्जबाजारी अमिताभ यांना लोकांनी पैशांच्या वसुलीसाठी धमकी दिली, शिवीगाळ केली, प्रतिक्षा हा बंगला सहारा फायनान्सकडे तारण ठेवावा लागला होता.

'कौन बनेगा करोडपती'चे 12 वे पर्व आज (28 सप्टेंबर) पासून छोट्या पडद्यावर सुरु होत आहे. यंदा कोरोना व्हायरसच्या साथीमुळे या शोमध्ये प्रेक्षक दिसणार नाहीत. मात्र 77 वर्षीय होस्ट अमिताभ बच्चन स्पर्धकांसह शूटिंग करत आहेत. बिग बींसाठी हा शो खास असण्यामागचे एक कारण म्हणजे 20 वर्षांपूर्वी 90 कोटींच्या कर्जातून मुक्त करण्यात या कार्यक्रमाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

 • पहिल्या पर्वाच्या 85 एपिसोडमधून 15 कोटी रुपये कमावले होते

2013 मध्ये इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीत बिग बींनी केबीसीविषयी सांगितले होते की, "हा कार्यक्रम अशा काळात मला भेटला जेव्हा मला याची सर्वात जास्त गरज होती. व्यावसायिक आणि आर्थिकदृष्ट्या याने एका उत्प्रेरकासारखे काम केले. या कार्यक्रमाने माझ्यावर असलेली थकबाकी चुकवण्यात मला खूप मोठी मदत केली." बातमीनुसार बिग बींनी पहिल्या पर्वातील 85 भागांतून सुमारे 15 कोटींची कमाई केली होती.

 • कुटुंबीय तयार नव्हते, बिग बीदेखील द्विधा मनःस्थिती होते

जेव्हा अमिताभ यांना या शोची ऑफर मिळाली तेव्हा त्यांच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांना त्यांनी छोट्या पडद्यावर काम करु नये असे वाटले होते. कारण टीव्हीवर जाण्याने त्यांचे स्टार व्हॅल्यू कमी होईल, असे त्यांना वाटले होते. स्वतः बिग बीदेखील याबाबत द्विधा मनःस्थितीत होते.

बिग बींचा होकार मिळवण्यासाठी शोच्या टीमने त्यांना लंडनला नेले आणि या शोचे ओरिजिनल व्हर्जन (यूके) 'हू वॉंट्स टू बी अ मिलियनेअर'च्या सेटवर एक दिवस घालवून बिग बींनी गोष्टी समजून घेतल्या. या शोवर बिग बी प्रभावित झाले आणि शो अगदी हुबेहुब यूके व्हर्जनसारखा करावा, या अटीवर त्यांनी या शोसाठी निर्मात्यांना आपला होकार दिला.

बिग बींची कर्जबाजारी होण्याची आणि त्यातून सावरण्याची ही आहे कहाणी

 • 1995 मध्ये कंपनीची स्थापना केली, जी 1996 पासून तोट्यात आली

1995 मध्ये अमिताभ यांनी अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड (एबीसीएल) ही कंपनी सुरू केली. कंपनीने पहिल्या वर्षात 65 कोटी रुपयांची उलाढाल गाठली आणि त्याचा नफा 15 कोटी रुपये होता. पण, दुसर्‍या वर्षाची वाढ चांगली नव्हती.

1996 मध्ये मध्ये या कंपनीने बंगळुरूमध्ये झालेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेच्या मॅनेजमेंटची जबाबदारी घेतली आणि यातून कंपनीला सुमारे चार कोटींचा तोटा सहन करावा लागला. त्यानंतर बिग बी आणि त्यांच्या प्रोफेशनल मॅनेजर्स यांच्यात वाद निर्माण झाला. यामुळे बिग बींना टॉप टीम बदलावी लागली. कंपनीच्या बॅनरचा 'मृत्यूदाता' हा चित्रपट फ्लॉप ठरला आणि कंपनीचे नुकसान झाले.

 • निधी रखडला, कर्जबाजारी झाले आणि लोकांनी पैशांसाठी शिवीगाळ करण्यास सुरवात केली

1999 मध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की, अमिताभ बच्चन यांच्याकडे आपल्या कर्मचार्‍यांना पगार देण्यासाठीही पैसे नव्हते. चित्रपट निर्मिती आणि वितरणासाठीचा निधी अडकला होता. कंपनीवरील लोकांचा विश्वास डगमगू लागला होता. लोकांनी पैशांसाठी बिग बींच्या घरी येऊन त्यांना शिवीगाळ करण्यासही सुरवात केली होती.

दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या प्रतिक्षा आणि दोन फ्लॅटच्या विक्रीवर स्थगिती दिली. यानंतर बिग बींनी सहारा इंडिया फायनान्सकडे आपला बंगला तारण ठेवला होता.

 • निकटवर्तीयांनी अमिताभ यांनी कंपनी बंद करण्याचा सल्ला दिला

अमिताभ बच्चन यांच्या म्हणण्यानुसार, जवळच्या लोकांनी त्यांना कंपनी बंद करण्याचा सल्ला देण्यास सुरुवात केली होती. तथापि, त्यांनी तसे केले नाही. कारण त्यांना वाटते की लोक त्यांच्या नावामुळेच कंपनीशी कनेक्ट आहेत.

 • बर्‍याच रात्री झोपले नाहीत, मग आयुष्य बदलणारी सकाळ उगवली

मुलाखतीत बिग बी म्हणाले होते, "माझ्या डोक्यावर नेहमी टांगती तलवार होती. बर्‍याच रात्री मी झोपलो नाही. एके दिवशी मी थेट यश चोप्राजी यांच्याकडे गेलो आणि मी दिवाळखोर झालोय, माझ्याकडे चित्रपट नाहीत. फक्त माझे घर आणि दिल्लीत थोडीशी मालमत्ता आहे, असे सांगितले. यशजींनी शांतपणे माझे म्हणणे ऐकले आणि मला 'मोहब्बतें'मध्ये भूमिका दिली. त्यानंतर मला जाहिराती, टीव्ही कार्यक्रम आणि चित्रपट मिळू लागले, ज्यामुळे माझ्यावरचे 90 कोटी रुपयांचे कर्ज मी फेडू शकलो."

'कौन बनेगा करोडपती'चे एक्स्ट्रा फॅक्ट्स

 • या शोला पूर्वी 'कौन बनेगा लखपती' असे नाव देण्यात आले होते आणि बक्षिसाची रक्कम 1 लाख रुपये होती. पण नंतर स्टार टीव्हीची पॅरेंट फर्म न्यूज कॉर्पोरेशनचे अध्यक्ष रुपर्ट मुर्डोक यांनी त्याचे नाव बदलून 'कौन बनेगा करोडपती' असे ठेवले आणि बक्षिसाची रक्कम वाढवून ती एक कोटी रुपये केली.
 • पहिल्या पर्वाच्या अफाट यशानंतर अमिताभ बच्चन यांच्यावर दुसर्‍या पर्वासाठी साइन केले गेले. पण, याच काळात अमिताभ आजारी पडले आणि हा कार्यक्रम अचानक बंद पडला. बिग बींच्या आजारपणामुळे 85 पैकी केवळ 61 भाग शूट केले गेले.
 • शोच्या तिस-या पर्वासाठी बिग बींनी नकार दिला. या पर्वात शाहरुख खान शोचा होस्ट झाला. मात्र होस्ट बदलल्यामुळे हे पर्व फ्लॉप ठरले. हा शो त्यावेळी स्टार प्लस वाहिनीवर प्रसारित झाला होता. स्टार प्लसवर प्रसारित झालेल्या शोचा हा शेवटचा सीझन होता.
 • चौथ्या पर्वापासून 'केबीसी' स्टार प्लस ऐवजी सोनी टीव्हीवर प्रसारित झाला आणि अमिताभ बच्चन होस्ट म्हणून परतले. येथून, शोने प्रत्येक पर्वासाठी टॅगलाइन देखील सुरू केली.
बातम्या आणखी आहेत...