आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Entertainment
 • Tv
 • Kaun Banega Crorepati 12, First Time In History, From The Registration Of KBC To The Process Of Election Of Participants Will Be Online

कौन बनेगा करोडपती:इतिहासात प्रथमच ऑनलाइन होणार KBC 12 ची रजिस्ट्रेशनपासून ते स्पर्धकांची निवड प्रक्रिया 

मुंबईएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनने KBC च्या 12व्या सीझनची घोषणा केली; पहिल्यांदाच एक संपूर्ण डिजिटल निवड आणि स्क्रीनिंग प्रक्रिया लागू केली
 • या शोचे प्रसिद्ध होस्ट अमिताभ बच्चन यांनी सहभागींना आमंत्रित करत म्हटले, “हर चीज को ब्रेक लग सकता है... सपनों को नहीं...''
 • 9 मे पासून नोंदणी सुरू होऊन 22 मे रोजी रात्री 9.00 पर्यंत चालू राहणार

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनने 'कौन बनेगा करोडपती' (KBC) च्या 12 व्या सीझनची घोषणा केली आहे. 20 वर्षांपूर्वी सुरू झालेला KBC हा बहुधा भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात प्रसिद्ध शो आहे. ज्ञानाच्या सामर्थ्याने सामान्य माणसाचे जीवन पालटून टाकणारा शो म्हणून KBC चा लौकिक आहे.  खास गोष्ट म्हणजे यंदाच्या 12 व्या सीझनची रजिस्ट्रेशन प्रक्रिया 9 मेपासून सूरु होत आहे. 

केबीसीच्या इतिहासात प्रथमच शोच्या रजिस्ट्रेशनपासून ते स्पर्धकांची निवड प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. स्मार्टफोन्सचा सर्वदूर झालेला प्रसार आणि सर्वसामान्य जागरूकता यामुळे सर्व कान्या-कोपर्‍यांपर्यंत KBC चा प्रचार होऊन पूर्वीपेक्षाही अनेक पटींनी जास्त मोठा प्रतिसाद मिळण्याची आशा आहे.

वाहिनीने अलीकडेच आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर या शोशी संबंधित एक व्हिडिओ शेअर केला आहे .  या व्हिडिओत अमिताभ बच्चन KBC मध्ये सहभागी होऊ इच्छिणार्‍या लोकांना आवाहन करत आहेत व पुन्हा एकदा सांगत आहेत की, हर चीज को ब्रेक लग सकता है... सपनों को नहीं... पहिल्यांदाच बिग बींनी KBC साठी आपल्या घरात राहूनच चित्रीकरण केले आहे.  नितेश तिवारी यांनी नोंदणीच्या प्रोमोचे दिग्दर्शन केले आहे. हीच यंदाच्या शोची टॅगलाइन आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनच्या निराशाजनक वातावरणात चैतन्य निर्माण करणारी अशी ही टॅगलाइन आहे. 

 • टप्पा 1 – नोंदणी

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन KBC च्या 12व्या सीझनची नावनोंदणी 9 मे पासून सुरू करून 22 मे पर्यंत चालू ठेवेल. अमिताभ बच्चन दररोज रात्री 9.00 वाजता सोनी टीव्हीवर एक नवीन प्रश्न विचारतील. तुम्ही या प्रश्नांची उत्तरे SMS किंवा सोनीलिवच्या माध्यमातून देऊ शकाल.

 • टप्पा 2 – स्क्रीनिंग

नोंदणी प्रश्नांची अचूक उत्तरे देणार्‍या लोकांमधून, काही पूर्व-निर्धारित नोंदणी निकषांच्या आधारे यादृच्छिक (रॅन्डम) रित्या काही प्रतिस्पर्धी निवडण्यात येतील, ज्यांचा पुढील मूल्यमापनासाठी टेलीफोनवरून संपर्क साधण्यात येईल.

 • टप्पा 3 – ऑनलाइन ऑडिशन

KBC च्या इतिहासात पहिल्यांदाच, सामान्य ज्ञान चाचणी आणि व्हिडिओ सबमिशनसह सोनीलिवच्या माध्यमातून ऑडिशन्स घेण्यात येतील. हे एक खूप कठीण काम वाटत असले, तरी एका साध्या ट्यूटोरियलच्या माध्यमातून त्याचे सर्व तपशील समजावून सांगण्यात येतील. हे ट्यूटोरियल सोनीलिववर सहज उपलब्ध असेल.

 • टप्पा 4 – व्यक्तीगत मुलाखत

ऑडिशनमधून निवडलेल्या लोकांची शेवटच्या फेरीत व्यक्तीगत मुलाखत घेण्यात येईल, जी व्हिडिओ कॉलमार्फत योजण्यात येईल. एका स्वतंत्र ऑडिट कंपनीद्वारे या संपूर्ण निवड प्रक्रियेची तपासणी करण्यात येईल.

 KBC हा लोकांसाठी केवळ एक गेम / क्विझ शो नाही; तर त्यापेक्षा बरेच काही आहे - नितेश तिवारी, लेखक-दिग्दर्शक 

"दर वर्षी जेव्हा आम्ही KBCचा विचार करण्यास सुरुवात करतो, तेव्हा आम्ही अनेक विचार आणि मते यावर मंथन करतो, जेणे करून एक प्रभावी नॅरेटिव्ह जन्माला यावे. परंतु यावेळी, सध्या आपण ज्या वातावरणात आहोत, त्यातूनच या शोला एक संदर्भ प्राप्त झाला आहे. KBC हा लोकांसाठी केवळ एक गेम / क्विझ शो नाही; तर त्यापेक्षा बरेच काही आहे. आपली व्यक्तीगत स्वप्ने साकार करण्याची ती एक संधी आहे. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी माणूस स्वप्न बघणे सोडत नाही, उलट स्वप्ने अधिकच लक्षणीय होतात आणि प्रोमोसाठी यातूनच एक विचार मिळाला. ही फिल्म चित्रित करणे हे एक मोठे आव्हान होते. आधी मी स्वतःचीच एक कच्ची फिल्म तयार केली आणि ती श्री. बच्चन यांना पाठवली, जेणे करून त्यांना माझी कल्पना समजून घेता यावी. त्यानंतर बच्चन यांनी ही अख्खी फिल्म आपल्या घरात स्वतःच चित्रित केली. मला आशा आहे की, हे अभियान प्रेक्षकांच्या अंतःकरणाला स्पर्श करेल आणि ते मनापासून यात सहभागी होतील."

बातम्या आणखी आहेत...