आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

KBC 13:शोमध्ये पोहोचलेल्या जॅकी श्रॉफ यांनी अमिताभ बच्चन यांना सांगितले, तुम्हीच माझ्या 'भिडू' भाषेचे जनक, ऐकून थक्क झाले बिग बी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बिग बींनी विचारले - 'भीडू भाषा तू कशी शिकलास?’

'कौन बनेगा करोडपती 13' च्या आगामी भागात अभिनेते जॅकी श्रॉफ आणि सुनी शेट्टी यांनी हजेरी लावली. शोचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शोमध्ये जॅकी यांनी खुलासा करताना त्यांच्या भिडू या भाषेचे जनक स्वतः अमिताभ बच्चन असल्याचे सांगितले. हे ऐकून बिग बी थक्क झाले. जॅकी यांनी 1982 मध्ये आलेल्या 'स्वामी दादा' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

बिग बींनी विचारले - 'भीडू भाषा तू कशी शिकलास?’
बिग बी जॅकी श्रॉफ यांना ‘भीडू एक प्रश्न विचारायचा आहे… ही जी भीडू भाषा आहे ती तू कशी शिकलास?’ असा प्रश्न विचारला. त्यावर जॅकी श्रॉफ म्हणाले “सर, मी अशा ठिकाणी राहत होतो की, आसपास अशीच भाषा बोलली जात असे. माझे कान उघडे होते, पण तोंड बंद होते. त्यामुळे माझ्या कानावर जे पडायचे, त्यातून मी बरेच काही शिकलो. शिवाय तुम्ही होतातच! बहुतांशी चित्रपटात तुम्ही असायचात, आम्ही तर मागाहून आलो. तुम्हीच आम्हाला ही ‘भिडू’ भाषा दिलीत. तुम्ही आम्हाला चांगल्या प्रकारे बोलायलाही शिकवलेत. पण ही मुंबईची भाषा देखील तुम्हीच आम्हाला दिलीत. अमर अकबर अँथनी मध्ये तुमचा एक डायलॉगसुद्धा होता.”

त्यानंतर बिग बींनी त्यांचा अमर अकबर अँथनी चित्रपटातील डायलॉग रिक्रिएट केला आणि म्हणाले, ‘ऐसा तो आदमी जीवन में दो समय भागता है, ऑलिंपिक का रेस हो, या पुलिस का केस हो. तुम किस लिए भाग रहा है भाई?’

या खेळात जिंकलेली रक्कम जॅकी श्रॉफ थेलेसेमिक इंडियाला तर सुनील शेट्टी विप्ला फाऊंडेशनला देतील. हा भाग 24 सप्टेंबर रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...