आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Kavita Kaushik's Husband Ronit's Big Disclosure, 'Abhinav Shukla Used To Do Objectionable Messages After Getting Drunk, Had To Take Help From The Police'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिग बॉस 14:कविता कौशिकचा पती रोनितचा मोठा खुलासा, 'दारू पिऊन आक्षेपार्ह मेसेज करायचा अभिनव शुक्ला, घ्यावी लागली होती पोलिसांची मदत'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनवला कंटाळून कविताने दोनदा पोलिसांची मदत घेतली होती.

आठवड्यात बिग बॉस 14 या रिअ‍ॅलिटी शोमध्ये अनपेक्षित एविक्शन बघायला मिळाले. रुबीना दिलैकसोबत झालेल्या वादानंतर कविता कौशिक अचानक घराबाहेर पडली होती. अभिनव शुक्लामुळे कविता आणि रुबीना यांच्यात अनेकदा वाद झालेला बघायला मिळाला. कविताने रुबीनाला सांगितले होते की, ती अभिनवला मागील आठ वर्षांपासून ओळखते आणि ते खूप चांगले मित्र होते. कविता घराबाहेर पडल्यानंतर आता तिचा पती रोनितने खुलासा केला की, अभिनव अनेकदा दारुच्या नशेत कविताला आक्षेपार्ह मेसेज पाठवायचा. अभिनवला कंटाळून कविताने दोनदा पोलिसांची मदत घेतली होती.

या आठवड्याच्या सुरुवातीला कविता कौशिक आणि रुबीना दिलैक यांच्यात चांगलाच वाद पेटला होता. हा वाद एवढा वाढला की, दोघींनीही एकमेकींवर हात उगारण्याची धमकीदेखील दिली. यावेळी अभिनवने पत्नी रुबीनाची बाजू घेत कविताला चांगले सुनावले होते.

अभिनवच्या या वागण्याने हैराण झालेल्या कविताचे पती रोनित बिस्वास यांनी सोशल मीडियावर लिहिले की, 'हा तोच व्यक्ती आहे जो आमच्या घरात चित्रपटाच्या शूटिंगसाठी आम्हाला भीक मागत होता. हा तोच आहे ज्याने आमच्या घरात फुकटात शूटिंग केले होते. कारण त्याला काही वैयक्तिक कारणांमुळे स्वतःचा घरात चित्रीकरण करता आले नव्हते. आणि आता तो तिच्यावर हात उगारण्याची भाषा करतो... पुरुष. खरंच.''

अभिनव नशेत कविताला मेसेज करायचा
पुढे खुलासा करताना रोनितने लिहिले, "ठीक आहे, आता मी सत्य काय ते सांगतो. आम्ही ज्याला जेंटलमन म्हणतोय, त्याला खरं तर दारुचे व्यसन आहे. आणि तो दारुच्या नशेत कविताला वेळीअवेळी मेसेज करुन भेटायला सांगत होता. हे प्रकरण इतके वाढले होते की कविताला पोलिसांची मदत घ्यावी लागली होती', असे रोनितने उघड केले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser