आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
छत्तीसगडच्या अनुपा दास 'कौन बनेगा करोडपती 12' च्या तिस-या करोडपती ठरल्या आहेत. अलीकडेच त्यांनी दिव्य मराठीसोबत बोलताना एवढी मोठी रक्कम आणि कुटुंबाची सद्यस्थिती याबद्दल काही खास गोष्टी शेअर केल्या आहेत.
खरे सांगायचे तर माझ्या आयुष्यात असे काहीतरी घडले याबद्दल मी स्वप्नातही कधी कल्पना केली नव्हती. मी करोडपती झाले आहे यावर अद्याप माझा विश्वास बसत नाहीये. मी स्वप्न पाहत आहे असे वाटत आहे. केबीसीने माझे आयुष्य पूर्णपणे बदलले आहे. माझ्याबद्दल आणि माझ्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन सुधारला आहे. मी खरंच शब्दांत माझ्या भावना व्यक्त करु शकत नाहीये.
शोमध्ये भाग घेण्याची ही माझी पहिली वेळ होती. मात्र मी पहिल्या सीझनपासून या शोमध्ये येण्याचा प्रयत्न करीत होते. बारा वर्षे दीर्घ प्रतीक्षा केल्यानंतर माझ्या प्रार्थनेला यश आले. आणि मला केबीसीमध्ये येण्याची 'वन्स इन लाइफटाइम' संधी मिळाली.
मी प्रामाणिकपणे माझा विजय माझ्या कुटुंबाला, विशेषत: माझ्या पालकांना समर्पित करेल. मी त्यांच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे केबीसीचे विजेतेपद मिळवू शकले.
हा पैसा मी माझ्या कर्करोग झालेल्या आईच्या उपचारांसाठी वापरणार आहे. ती तिस-या स्टेजच्या कर्करोगाशी लढा देत आहे. सध्या, मी आणि माझे कुटुंब कठीण परिस्थितीतून जात आहोत, कारण आमचा बहुतांश पैसा रुग्णालयात खर्च झाला आहे. आता, माझ्या जवळ जे काही आहे ते त्यांचेच आहे. मी या शोमध्ये जे काही कमावले आहे ते मी माझ्या कुटुंबाला देईल. देवाच्या कृपेने, आमच्याकडे आमच्या आईला सर्वोत्कृष्ट उपचार देण्यासाठी पैसे आले आहेत.
शेवटच्या प्रश्नात मला दोन खेळाडूंबद्दल विचारले गेले होते की ते कोणत्या संघाचे आहेत. मला त्या खेळाविषयी फारशी माहिती नसल्यामुळे पहिल्या काही मिनिटांत मी खूप घाबरले होते. मी या टप्प्यावर पोहोचल्यानंतर इतका मोठा धोका पत्करू शकत नव्हती. मी एका चुकीच्या उत्तरामुळे जिंकलेली रक्कम गमावण्यास तयार नव्हते. एक कोटी ते सात कोटीमधील फरक एक कोटी ते तीन लाख वीस हजारांमधील फरकापेक्षा खूपच कमी होता असे मला वाटले. म्हणून मी शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मी शोमध्ये जे काही मिळवले त्यामुळे मी खूप आनंदी आहे.
माझ्या कुटुंबात माझे आईवडील, दोन लहान बहिणी आहेत. दोघीही विवाहित असून त्यांना मुलं आहेत. माझे 8 लोकांचे कुटुंब माझे संपूर्ण जग आहे. मी घटस्फोटित आहे. 2009 मध्ये माझे लग्न झाले होते. मात्र महिनाभरातच घटस्फोट झाला. म्हणूनच, गेली 11 वर्षे माझ्यासाठी खूप कठीण राहिली आहेत, विशेषतः माझ्या आईच्या तब्येतीमुळे गेली दोन वर्षे अडचणींची ठरली. पण, मी म्हटल्याप्रमाणे, माझे कुटुंब माझे सामर्थ्य आहे. मी आज जे काही आहे, ते फक्त माझ्या कुटुंबाच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळे आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.