आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कौन बनेगा करोडपती 12:चित्रपटात शाहरुखला वाईट वागणूक दिल्याने नाराज झाली महिला स्पर्धक, बिग बींना मागावी लागली हात जोडून माफी

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बिग बींची नव्हे शाहरुखची चाहती आहे रेखा रानी

'कौन बनेगा करोडपती'चे 12 वे पर्व सध्या छोट्या पडद्यावर सुरु आहे. या शोमध्ये बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन पुन्हा एकदा स्पर्धकांना प्रश्न विचारताना दिसत आहेत. या शोमध्ये आजवर बिग बींच्या अनेक चाहत्यांनी हजेरी लावली. हे स्पर्धक बिग बींचे कौतुक करताना थकत नाहीत. मात्र अलीकडेच या शोमध्ये बिग बींच्या नव्हे तर शाहरुख खानच्या एका चाहतीने हजेरी लावली होती. आणि यावेळी बिग बींना चक्क तिची माफी मागावी लागली.

झाले असे की, मंगळवारच्या भागात बिग बींसमोर हॉट सीटवर दिल्लीची 27 वर्षीय रेखा रानी नावाची स्पर्धक बसली होती. यावेळी तिने सांगितले की, ती त्यांची नव्हे तर किंग खान शाहरुखची मोठी चाहती आहे. यावेळी तिने बिग बी यांची खटकलेली एक गोष्ट त्यांना थेटपणे सांगितली.

‘मोहब्बते’ या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांनी एकत्र काम केले होते. या चित्रपटातील एका सीनमध्ये अमिताभ बच्चन यांनी शाहरुखला चांगलेच खडसावले होते. मात्र, रेखा रानीला हे अजिबात पटले नसून तिने बिग बींना असे करण्यामागचे कारण विचारले. त्यावर अमिताभ यांनीही स्पष्टीकरण देत, तो चित्रपटाचा भाग असल्याचे सांगितले.

रेखा रानी बिग बींना म्हणाली की, मोहब्बते चित्रपटात तुम्ही शाहरुखला ओरडलात. तसेच ‘कभी खुशी कभी गम’मध्ये तुम्ही त्याला घराबाहेर काढले. त्यावेळी मी खूप रडले होते. त्यावर अमिताभ यांनी रेखा रानीची माफी मागितली आणि सोबतच शाहरुख जेव्हा भेटेल त्यावेळी त्याचीही माफी मागेल, असे म्हटले.

अमिताभ आणि शाहरुख यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'मोहब्बतें' या चित्रपटाच्या रिलीजला गेल्याच आठवड्यात 20 वर्षे पूर्ण झाली आहेत.