आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

KBC 13 च्या मंचावर 'सूर्यवंशी'ची टीम:KBC 13 च्या शानदार शुक्रवारच्या भागात अक्षय कुमार, कतरिना कैफ आणि रोहित शेट्टीची हजेरी, अमिताभ बच्चनसोबत दिवाळीचा उल्हास करणार द्विगुणित

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • येत्या 5 नोव्हेंबर रोजी हा खास भाग प्रेक्षकांना बघता येणार आहे.

येत्या शुक्रवारी सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपती 13 च्या शानदार शुक्रवारच्या खास भागात येणार आहेत अक्षय कुमार, कतरिना कैफ आणि रोहित शेट्टी. 1 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान खास दिवाळीच्या निमित्ताने या शोचा सेट दिव्यांनी उजळून निघणार आहे आणि रांगोळ्यांनी सुशोभित होणार आहे. बिग बी अक्षय, कतरिना आणि रोहितसह प्रेक्षकांच्या सोबतीने मोठ्या उत्साहात दिवाळीचा सण साजरा करणार आहेत. शानदार शुक्रवारच्या भागात हे तिन्ही पाहुणे हॉट सीटवर विराजमान होतील आणि होस्ट अमिताभ बच्चनसह हा खेळ खेळताना दिसतील.

हा खेळ खेळण्याशिवाय अक्षय कुमार, कतरिना कैफ आणि रोहित शेट्टी या शोमध्ये अनेक गंमती जमती करताना दिसतील. कतरिना कैफ सूर्यवंशीचा सेट साफ करतानाचा व्हिडिओ, अमिताभ बच्चन आणि कतरिना यांचा ‘टिप टिप बरसा पानी’वरील डान्स, चित्रपटात येण्याआधीचा अक्षय कुमारचा संघर्ष आणि याराना चित्रपटातील ‘सारा जमाना’ गाण्यावरील त्याचा डान्स अशा बर्‍याच गंमतीजमती या शानदार शुक्रवारच्या भागात प्रेक्षकांना बघता येतील.

अमिताभ बच्चनसोबत हे तिन्ही पाहुणे कलाकार प्रेक्षकांना मस्ती, मनोरंजन, हास्यविनोद, आणि खेळाच्या सफरीवर घेऊन जाणार आहेत आणि कार्यक्रम रंगतदार करणार आहेत. या क्षेत्रातील कामगिरीबद्दल अमिताभ बच्चन अक्षय कुमार, रोहित शेट्टी आणि कतरिना कैफ या तिघांचे तोंड भरून कौतुक करताना दिसतील. इतकेच नाही, तर रोहित शेट्टींनी आपल्या आईसाठी लिहिलेल्या ब्लॉगवर अमिताभ बच्चन यांनी सही करावी अशी रोहित शेट्टी बिग बी यांना विनंती करताना दिसतील.

या खेळातून जिंकलेली रक्कम अक्षय कुमार, कतरिना कैफ आणि रोहित शेट्टी भारत के वीर या सरकारी वेबसाइटला दान करतील, जी वेबसाइट देशाची सेवा करताना शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबांना मदत करते. येत्या 5 नोव्हेंबर रोजी हा खास भाग प्रेक्षकांना बघता येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...