आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाच्या विळख्यात सेलेब्स:'खतरों के खिलाडी'वर कोरोनाचे सावट, अनुष्का सेन पॉझिटिव्ह, इतर स्पर्धकांचा रिपोर्ट आला निगेटिव्ह

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सध्या अनुष्का क्वारंटाइनमध्ये आहे

सोशल मीडियावरील प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि अभिनेत्री अनुष्का सेनला कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, तिच्या बरोबरचे इतर सर्व स्पर्धक सुरक्षित आहेत. अनुष्का सध्या केपटाऊनमध्ये असून येथेती खतरों के खिलाडी -11 चे शुटिंग करत आहे. अनुष्काला कोणतीही लक्षणे दिसली नाहीत, परंतु सध्या ती क्वारंटाइनमध्ये आहे

अनुष्का आयसोलेट झाल्यानंतर झाले चित्रीकरण
स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार, अनुष्काचा कोरोना रिपोर्ट सोमवारी आला, त्यानंतर उर्वरित सर्व स्पर्धक आणि क्रू मेंबर्सनी खबरदारी म्हणून चाचणी करुन घेतली. सुदैवाने इतर कुणालाही कोरोनाची लागण झाली नाही. अनुष्का आयसोलेट झाल्यानंतर इतर टीम आणि क्रू मेंबर्ससह शूटिंग पूर्ण करण्यात आले.

ये आहेत शोचे स्पर्धक
श्वेता तिवारी, राहुल वैद्य, दिव्यांका त्रिपाठी, निक्की तांबोळी, अभिनव शुक्ला, विशाल आदित्य सिंह, आस्था गिल, सौरभ राज जैन, अर्जुन बिजलानी, महल चहल, वरुण सूद आणि सना मकबूल हे टीव्ही स्टार्स या शोमध्ये सहभागी झाले आहेत. हा शो जुलै महिन्यात ऑन एअर होऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...