आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया हे मागील काही दिवसांपासून ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत आहेत. भारती आणि हर्ष यांनी ड्रग्जचे सेवन केल्याची कबुली एनसीबीकडे दिली आहे. त्यानंतर त्यांना अटकदेखील झाली होती. सध्या दोघेही जामीनावर बाहेर आहेत. या सर्व घटनेमुळे भारतीवर सर्व स्तरातून आता टिका होऊ लागली आहे. यामुळे सोनी टीव्हीने आता भारतीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ड्रग्ज प्रकरणात अडकल्यामुळे सोनी टीव्हीने भारतीची ‘द कपिल शर्मा शो’मधूनही हकालपट्टी केल्याचे कळते आहे. मात्र अद्याप चॅनेलकडून यासंदर्भात अधिकृत घोषणा झालेली नाही. तर दुसरीकडे द कपिल शर्मा शोच्या टीमने आम्ही भारतीच्या पाठीशी उभे आहोत. काहीही झाले तरी भारतीला शोमधून बाहेर जाऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला आहे.
भारती कपिल शर्मा शोमध्ये दिसणार नसल्याचे समजते. मात्र चॅनेलचा हा निर्णय कपिलला मान्य नाही. सोनी टीव्हीने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये भारतीवर बंदी घालू नये, असे कपिलचे म्हणणे आहे. कपिल शर्मा शो हा फॅमिली शो आहे. त्यामुळे या शोमध्ये कोणत्याही वादग्रस्त व्यक्तींनी सहभागी नसावे, अशी चॅनेलची इच्छा आहे.
कपिलच्या कॉमेडी शोमध्ये काम करणारा किकू शारदा म्हणतो की, ‘आम्ही काल शूट केले आणि भारती आमच्या शूटिंगसाठी हजर नव्हती. पण भारती ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये नसणार याच्या बद्दल कोणालाही काहीही माहिती नाही. आणि ती काल शूटवर हजर नव्हती कारण, भारतीचे काही शूट नव्हते आणि कपिल शर्माच्या शोचा भाग भारती नसणार अशा कुढल्याच निर्णया बद्दल माहिती नाही.’
तर कृष्णा अभिषेक म्हणाला, ‘काहीही झाले तरी कपिल आणि मी नेहमी भारती सिंहबरोबर उभे राहू. मी भारतीचे समर्थन करीन. ती कामावर परत आलीच पाहिजे. जे व्हायचे ते होऊ दे. मी आणि कपिल, किंबहुना आम्ही सगळेच भारती आणि हर्ष यांच्यासमवेत उभे आहोत. तीला माझे संपूर्ण सहकार्य मिळेल आणि चॅनेलने आतापर्यंत असे कोणतेही पाऊल उचललेले नाही. आम्हालाही याबाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.’
ड्रग्ज प्रकरणात कसे समोर आले होते भारती आणि हर्षचे नाव?
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण समोर आले. एनसीबीने शनिवारी सकाळी खार दांडा परिसरात छापा घातला होता. कारवाईत अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या 21 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून 15 एलएसडी डॉट्स, 40 ग्रॅम गांजा आणि नायट्रोझेपाम औषध आदी अंमली पदार्थ एनसीबीने हस्तगत केले होते. त्याच्या चौकशीतून भारती आणि तिच्या नव-याचे नाव समोर आले होते.
21 नोव्हेंबर रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाने भारतीच्या घरावर छापा टाकला होता. त्यावेळी तिच्या घरात अंमली पदार्थ आढळून आल्यामुळे एनसीबीने दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत भारती आणि तिचा पती हर्ष यांनी अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची कबुली दिली होती. त्यानंतर एनसीबीने एनडीपीएस कायदा 1985, कलम 20 अ, 20 ब 2 आणि 27 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली होती. या दोघांनाही मुंबई किल्ला कोर्ट न्यायालयाने 14 दिवसांची म्हणजे 4 डिसेंबरपर्यंत न्यायलयीन कोठडी सुनावली होती. मात्र नंतर दोघांनीही जामिनासाठी अर्ज केला होता. 23 नोव्हेंबर रोजी दोघांना जामीन मंजूर झाला होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.