आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
टीव्ही इंडस्ट्रीतील अभिनेत्री प्रीती तलरेजाने तिचा नवरा अभिजीत पेटकर याच्याविरूद्ध पोलिसात एफआयआर दाखल केला आहे. प्रीतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्यावर होत असलेल्या अत्याचारा वाचा फोडली आहे. प्रीतीने सांगितल्यानुसार, ती सुरुवातीला मुंबई पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी पोहोचली होती, परंतु त्यांनी तक्रार नोंदवून न घेतल्याने तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पीएमओला सोशल मीडियावर टॅग करुन आपली आपबीती सांगितली.
आता खडकपाडा वेलफेअर पोलिसांनी प्रीतीच्या तक्रारीवरून तिच्या पतीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याची प्रत सुमन होले यांनी शेअर केली होती.
UPDATE ON @preitytalreja's CASE:
— Sunaina Holey (@SunainaHoley) January 6, 2021
FIR has been filed against Abhijeet Petkar (Converted to Islam) last evening at Khadakpada Police Station, Kalyan.
Thanks to @Dev_Fadnavis Dada & @KiritSomaiya Bhai for all the support 🙏 pic.twitter.com/EAqpt0HXwo
काय आहे संपूर्ण प्रकरण?
प्रीतीने तीन वर्षांपूर्वी जिमचा मालक असलेल्या अभिजीत पेटकर याच्याशी लग्न केले. मागील काही दिवसांपासून प्रीती सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार, पोलिस आणि इतरांकडून मदत मागत आहे. प्रीतीने आपल्या पोस्टमध्ये सांगितल्यानुसार, तिचा नवरा अभिजीत पेटकर मुस्लिम आहे, आणि दोघांनीही मशिदीत लग्न केले होते. मुस्लिम असूनही तिचा नवरा लीगल डॉक्युमेंटवरील अभिजीत पेटकर या नावाचा वापर करतो.
मुस्लिम कायद्यानुसार त्याला मशिदीकडून प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. आता अभिजीतने प्रीतीवर धर्म बदलण्याचा दबाव आणत असून तिला सतत मारहाण करतोय. प्रीतीने सोशल मीडियावर तिच्यासोबत झालेल्या मारहाणीचा व्हिडिओदेखील शेअर केला.
प्रीतीची सोशल मीडियावर बरीच छायाचित्रे आहेत. ज्यात तिच्या चेह-यावर मारहाणीच्या जखमा दिसत आहेत. एका पोस्टमध्ये प्रीतीने लिहिले, की तिचा नवरा अभिजीतने तिला मुस्लिम असल्याचे सांगितले होते. पण धर्म परिवर्तनाची कोणतीही कागदपत्रे त्याच्याजवळ नाहीत. ती म्हणते, 3 वर्षांपासून प्रेमाच्या नावाखाली तो माझी फसवणूक करतोय. एखाद्या चांगल्या भविष्यासाठी एखाद्यावर प्रेम करणे किंवा त्यावर विश्वास ठेवणे ही एक चूक आहे?, असा प्रश्न प्रीतीने उपस्थित केला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.