आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वडिलांचा माफीनामा:जानच्या मराठी भाषेच्या अवमानप्रकरणी कुमार सानू यांनी मागितली माफी, आईला दोषी ठरवत म्हणाले - 'आईने कशी शिकवण दिली माहिती नाही'

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कुटुंबापासून 27 वर्षांपासून दूर आहेत कुमार सानू

प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू याने ‘बिग बॉस 14’च्या घरात मराठी भाषेविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. मराठी भाषेची चीड येते, असे विधान केल्यानंतर सर्वच स्तरातून त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे. याप्रकरणी शिवसेना आणि मनसेने आक्रमक पवित्रा घेत जानची शोमधून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. वाढता वादंग बघता याप्रकरणी कलर्स वाहिनीने, जान सानूच्या आईने आणि स्वत: जान सानूने माफी मागितली. त्यानंतर आता जानचे वडील कुमार सानू यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करुन मुलाच्या चुकीबद्दल माफी मागितली आहे. या व्हिडिओमधून ते आपल्या कुटुंबापासून ब-याच वर्षांपासून दूर असल्याचेही समोर आले आहे.

  • कुटुंबापासून 27 वर्षांपासून दूर आहेत कुमार सानू

एका व्हिडिओद्वारे कुमार सानू यांनी मुलाच्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. सोबतच कुटुंबापासून गेल्या 27 वर्षांपासून दूर असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. ते म्हणाले, “गेल्या 41 वर्षांत मला महाराष्ट्राने आणि मुंबईने खूप काही दिलंय. मुंबईबद्दल किंवा महाराष्ट्राबद्दल मी कुठलीच चुकीची गोष्ट माझ्या मनातसुद्धा आणू शकत नाही. पण माझ्या मुलाने खूप मोठी चूक केली आहे. त्याच्या आईने त्याला कशी शिकवण दिली माहित नाही, पण त्याच्या वडिलाच्या नात्याने मी सर्वांची हात जोडून माफी मागतो. गेली 27 वर्षे तो माझ्यासोबत राहत नाही”, असे ते म्हणाले आहेत. हा व्हिडिओ टीव्ही 9 च्या पत्रकार शिवांगी ठाकुर यांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.

  • यापूर्वी जान कुमारने मागितली होती आपल्या वक्तव्याबद्दल माफी

जानने मराठी भाषेबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन वादंग उठल्यानंतर बिग बॉसच्या घरात जान याला कन्फेशन रुममध्ये बोलवण्यात आले. यावेळी त्याला कोणतीही भाषा, धर्म आणि जात, सांप्रदाय यावर बिग बॉसच्या घरात चर्चा करण्यास मनाई असल्याचं सूचित करण्यात आले. त्याचबरोबर बिग बॉसच्या घरात सर्वप्रकारच्या भाषा, जाती-धर्माच्या लोकांचे स्वागत केले जाते, असेदेखील ठणकावून सांगण्यात आले. त्यानंतर जानने माफी मागितली.

अडीच मिनिटांच्या व्हिडिओत जान सानू म्हणला, “नमस्कार माझे नाव जान कुमार सानू आहे. माझ्याकडून नकळत एक चूक झाली, ज्यामुळे मराठी भाषिकांना आणि त्यांच्या अस्मितेला ठेच पोहोचली आहे. मी मराठी लोकांची मनापासून माफी मागतो. मराठी भाषिकांना वाईट वाटावे, असा माझा हेतू नव्हता. माझ्यामुळे बिग बॉसलाही शरमेने मान खाली घालाली लागली. त्यामुळे बिग बॉसचीही माफी मागतो. अशा प्रकारची चूक पुन्हा होणार नाही, याची मी काळजी घेईन”, अशा शब्दांत जान याने माफी मागितली आहे.

  • काय होते संपूर्ण प्रकरण?

‘बिग बॉस’च्या घरात मराठमोळा गायक राहुल वैद्य स्पर्धक म्हणून सामील झाला आहे. या कार्यक्रमात जान कुमार सानू आणि निक्की तंबोली यांच्यात मैत्री दाखवण्यात आली होती. काही कारणाने या दोघांमध्ये बिनसल्याने निक्कीने जानची साथ सोडत, राहुल वैद्यचा हात धरला आहे. दरम्यान ती राहुलशी मराठीतून संवाद साधण्याच्या प्रयत्न करताना दिसली. याच दरम्यान तिने जानशी देखील मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जानने तिला माझ्याशी मराठीत बोलायचा प्रयत्न करू नको. बोलायचे असल्यास हिंदीत बोल. मला मराठी ऐकून चीड येते, असे म्हटले.