आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कबुली:‘कुमकुम भाग्य’मधील श्रुती झा सांगते, 'माझ्या बहिणीने समजूत काढली नसती, तर मी आज अभिनय क्षेत्रात नसते!'

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • श्रुती झा सांगते, मी एक अभिनेत्री आहे, हे माझं मलाच पटत नव्हतं.

छोट्या पडद्यावरील गाजत असलेल्या ‘कुमकुम भाग्य’ या मालिकेतील अभी (शब्बीर अहलुवालिया) आणि प्रज्ञा (श्रुती झा) यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. हे दोन्ही कलाकार छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कलाकार आहेत. पण प्रेक्षकांच्या लाडक्या प्रज्ञाला मुळात अभिनेत्रीच बनायचे नव्हते?, हे तुम्हाला ठाऊक आहे का?

बिहारमधील बेगुसरायमधील श्रुती ही लहानपणापासूनच अभ्यासू मुलगी होती आणि तिच्या मोठ्या महत्त्वाकांक्षा होत्या. पण आपण कधी अभिनेत्रीही होऊ, अशी गोष्ट तिने कधी स्वप्नातही पाहिली नव्हता. तिने शाळेत अनेकदा नाटकांतून भूमिका साकारल्या होत्या, पण मुंबईत येऊन अभिनयाच्या क्षेत्रात कारकीर्द करण्याची कल्पनाही तिने कधी केली नव्हती. मात्र तिची मोठी बहीण मीनाक्षी हिने तिची समजूत काढली आणि तिला अभिनेत्री होण्यासाठी उद्युक्त केले. मीनाक्षीनेच तिच्या आई-वडिलांचीही समजूत घातली आणि श्रुतीला मुंबईला पाठविले.

मोठ्या बहिणीसोबत श्रुती झा
मोठ्या बहिणीसोबत श्रुती झा

‘कुमकुम भाग्य’मध्ये प्रज्ञाची भूमिका साकारणार्‍्या श्रुती झा हिने याविषयी सांगितले, “मीनाक्षीच माझ्यावतीने सर्वांशी भांडत असे. मी एक अभिनेत्री आहे, हे माझं मलाच पटत नव्हतं आणि मुंबईत येऊन या क्षेत्रात कारकीर्द घडविण्याचा मी कधी विचारही केला नव्हता. मी माझी पहिली ऑडिशन दिली, तेव्हा मला ही भूमिका मिळेल, असं मला अजिबात वाटलं नव्हतं. ही ऑडिशन एका मॉडेलिंग कंपनीच्या कार्यालयात घेतली जात होती. तेव्हा तिथे खूप सुंदर मुली आल्या होत्या. मी कॉलेजातून थेट तिथे गेले होते. ना मी मेक-अप केला होता, ना माझे कपडे चांगले होते. मी अगदी साध्या वेशात होते. मी तर तेव्हा चष्माही लावला होता. ऑडिशनच्या वेळी मला तो काढायला सांगण्यात आला. त्यानंतर माझी खात्रीच पटली की माझी निवड काही होणार नाही. त्यामुळे मी फारसा प्रयत्नही केला नाही. पण मला वाटतं, त्यांना माझा नैसर्गिक अभिनय आवडला आणि म्हणून मला ही भूमिका मिळाली. पण ही भूमिका मिळाल्यावरही मला खात्री वाटत नव्हती की या भूमिकेमुळे माझी अभिनय क्षेत्रात मोठी कारकीर्द उभी राहील. मी मुंबईला जाईन आणि एक अभिनेत्री बनेन असं मला कधीच वाटलं नव्हतं.”

श्रुती पुढे म्हणाली, “माझ्या आईवडिलांनीही मला खूप सांभाळून घेतलं, पण आमच्यापैकी कोणालाच शोबिझबद्दल काही माहिती नव्हती. अभिनयाच्या क्षेत्रात येण्याचा किंवा मुंबईला येण्याची माझी कोणतीही योजना नव्हती. या क्षेत्रात काही वर्ष प्रयत्न करण्याचाही काही प्रश्न नव्हता. त्यामुळे मला ही भूमिका मिळाल्यावर त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. पण माझ्या बहिणीचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता आणि तिनेच आमची सर्वांची समजूत घातली. तिला इतका विश्वास का वाटत होता, ते मलाही सांगता येणार नाही. खरं तर तिने मला कधी रंगमंचावर अभिनय करताना बघितलंही नव्हतं. तरीही ती म्हणाली की मी ही संधी वाया घालविता कामा नये. आज मला वाटतं की जर माझ्या बहिणीने माझी समजूत घालून मला अभिनय करण्यास तयार केलं नसतं, तर मी मुंबईत आले नसते आणि तुमची प्रज्ञाही बनले नसते. मी ही ऑफर फार गंभीरपणे घेत नव्हते, पण त्याबद्दल तुम्हाला माझ्या बहिणीचेच आभार मानावे लागतील.”